Virat Kohli : विराट कोहलीने केली ‘या’ खेळाडूच्या शतकांच्या विक्रमाची बरोबरी! | पुढारी

Virat Kohli : विराट कोहलीने केली 'या' खेळाडूच्या शतकांच्या विक्रमाची बरोबरी!

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय क्रिकेट संघाचे आशिया चषकातील आस्तिस्व संपुष्टात आले आहे. पाकिस्तानकडून पराभवाला सामोरे गेल्यानंतर भारतीय संघाचा अंतिम फेरीतील प्रवेशाच्या मार्ग खडतर बनला होता. अफगाणिस्ताने पाकिस्तानला पराभूत केले असते तर भारताच्या अंतिम सामन्यातील प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला असता. पण, पाकिस्तानने अफिगाणिस्तानचा पराभव केल्याने भारताचे आशिया चषकातील आस्तित्व संपुष्टात आले. (Virat Kohli)

काल भारत आणि अफगाणिस्तान दरम्यान झालेल्या सामन्यात भारताचा ‘रनमशिन कोहली’ने तब्बल अडीच वर्षांनंतर शतक साजरे करत आपला शतकाचा दुष्काळ संपवला. विराट कोहलीच्या शतकामुळे भारतीय चाहत्यांच्या उत्साहात अधिकच भर पडली. विराट कोहलीचे हे टी-20 प्रकारातील पहिलचे शतक आले. या हे त्याचे कारकिर्दीतील 71वे शतक आले. हे शतक करताना त्याने ऑस्ट्रेलियाच्या महान खेळाडूच्या शतकाशी बरोबरी केली आहे.

विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाच्या ज्या महान खेळाडूच्या शतकांशी बरोबरी केली त्याचे नाव आहे ‘रिकी पॉंटिंग’. रिकी पाँटिंगने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत एकूण 668 सामने खेळून 71 शतके झळकावली आहेत. यामध्ये कसोटीमध्ये 41 तर एकदिवसीय सामन्यात 30 शतके झळकावली आहेत. तर विराट कोहलीने आशिया कपमधील अफगानिस्तानविरुध्दच्या सामन्यात टी-20 मध्ये पहिले शतक झळकवले. त्याने 522 डावात 71 शतक केले आहेत. (Virat Kohli)

विराट कोहलीने आशिया चषकात टी-20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले. त्याचे आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील हे ७१वे शतक आहे. कोहलीने आतापर्यंत कसोटीत 27 शतक, वनडेमध्ये 43 आणि टी-20 मध्ये एक शतक झळकावले आहे. त्याने हे शतक अडीच वर्षानंतर झळकावले आहे. या शतकासह कोहलीने ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगच्या आंतरराष्ट्रीय शतकांच्या विक्रमाशी बरोबरी केली. आंतरराष्ट्रीय शतकांच्या बाबतीत कोहली आता भारताचा माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकरच्या मागे आहे. सचिनने आपल्या कारकिर्दीत 100 आंतरराष्ट्रीय शतके झळकावली आहेत.

तेंडुलकरच्या नावावर कसोटीत 51 आणि वनडेत 49 शतके आहेत. कोहलीने अफगाणिस्तानविरुद्ध 53 चेंडूत शतक झळकावले. कोहलीने 61 चेंडूत 12 चौकार आणि 6 षटकारांसह नाबाद 122 धावांची खेळी केली. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेट 200 होता. आंतरराष्ट्रीय टी-20 मधील हे त्याचे पहिले शतक होते. आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये सर्वाधिक शतके करण्याचा विक्रम रोहित शर्माच्या नावावर आहे. या फॉरमॅटमध्ये त्याने चार शतके झळकावली आहेत.

कोहलीने खेळलेली खेळी कोणत्याही भारतीय फलंदाजाने टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये खेळलेली सर्वोत्तम खेळी आहे. त्याने या बाबतीत रोहित शर्माचा विक्रम मोडला. याआधी रोहितने टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 118 धावा केल्या होत्या. T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या अॅरॉन फिंचच्या नावावर आहे. फिंचने 2018 मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध 76 चेंडूत 172 धावा केल्या होत्या.

हे ही वाचा : 

Back to top button