

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड आणि क्रिकेटविश्वात नेहमीच चर्चेत राहणारी जोडी म्हणजे अनुष्का शर्मा आणि विराट कोहली. त्यांचे फोटो देखील सोशल मिडीयावर नेहमी व्हायरल होत असतात. अलीकडेच अनुष्का शर्माने तिच्या इंस्टाग्रामवर पती विराटसोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो अभिनेत्रीने लंडनमध्ये सुरू असलेल्या तिच्या चित्रपटाच्या शूटमधून काढले आहेत.
अनुष्काने लंडनमधील कॉफी पितानाचे फोटो शेअर केले
अनुष्का शर्माने विराटबरोबर काॅफी पितानाचे फोटो शेअर केले आहेत. ती आणि विराट कोहली कॉफीचा आनंद घेतानाचे फोटो शेअर केले आहे. ते दोघे निवांत बसलेले आहेत. दोघांची कूल स्टाइल चाहत्यांच्या पसंतीस पडली आहे. या फोटोंमध्ये दोघेही आपल्या व्यस्त शेड्युलमधून वेळ काढून थंडीत बसून एकमेकांच्या या सुंदर क्षणांचा आनंद घेताना दिसत आहेत. ते एकमेकांशी बोलताना आणि हसताना दिसत आहेत.
विराटने देखिल शेअर केले फोटो
अनुष्का शर्माच्या चकदा एक्सप्रेस सिनेमाचे शूटिंग इंग्लंडला सुरू आहे. या दरम्यान विराटने देखिल अनुष्काबरोबरचा सेल्फी शेअर केले आहेत. सकाळच्या वेळी सुर्यकिरनांचा आनंद घेतानाचा फोटो त्याने शेअर केला आहे. त्या दोघांनी घातलेल्या कपड्यांवरून असे जाणवत आहे की तेथिल वातावरण खुप थंड आहे. त्या दोघांनी अंगात स्वेटर व डाेक्याला टोपी घातलेली आहे. या दोघांनी शेअर केलेल्या फोटोला चाहत्यांची खूप पसंती मिळाली आहे.
अनुष्का शर्मा लवकरच झूलन गोस्वामीच्या बायोपिक चकदा एक्सप्रेस सिनेमात दिसणार आहे. विराटने एशिया कपमध्ये जवळपास तीन वर्षांच्या खराब फॉर्मनंतर आपले पहिले टी २० शतक झळकावले. भारताने एशिया कप मधील आव्हान संतूष्टात आल्यानंतर विराटने थेट लंडन गाठले. तिथे अनुष्काच्या चित्रपटाचे शूटिंग सुरू आहे. यादरम्यान अनुष्काचा नो मेकअप लूक चाहत्यांना आवडला आहे. त्याचबरोबर पॉवर कपल असल्याने त्या दाेघांच्या लव्हस्टोरीची चर्चादेखिल चाहत्यांना आवडते.