IND vs SA 1st T20 : भारताचा दक्षिण आफ्रिकेवर ८ गडी राखून विजय | पुढारी

IND vs SA 1st T20 : भारताचा दक्षिण आफ्रिकेवर ८ गडी राखून विजय

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताच्या दौऱ्यावर आलेल्या दक्षिण आफ्रिकेला पहिल्या टी २० सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा ८ गडी राखून धुव्वा उडवला. केएल राहुल आणि सुर्यकुमार यादव यांनी केलेल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने दक्षिण आफ्रिकेवर विजय संपादन केला. हा सामना तिरुवंतपुरनच्या ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवण्यात आला. दक्षिण आफ्रिकेने दिलेल्या १०७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सुर्यकुमार यादवने ४ षटकार आणि २ चौकार लगावत ५१ धावा काढल्या. तर सुर्यकुमार यादवने ३ षटकार आणि ५ चौकार लगावत ३३ चेंडूमध्ये अर्धशतकी खेळी केली. (IND vs SA 1st T20)

भारताची सुरुवात चांगली झाली नाही. तिसऱ्या षटकात कर्णधा रोहित शर्माला गोलंदाज कगिसो रबाडा याने शुन्यावर बाद केले. यानंतर आलेला विराट कोहली सुद्धा फारसे काही करु शकला नाही. सातव्या षटकात नार्खियाने त्याला केवळ ३ धावांवर बाद केले. यानंतर मात्र केएल राहूल आणि सूर्यकुमार यादव यांनी आफ्रिकेला विकेट बहाल केली नाही. सावध सुरुवात करत दोघांनी जम बसल्यावर आफ्रिकेच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. दोघांनी नाबाद ९३ धावांची भागिदारी रचत पहिल्या टी २० सामन्यात भारताला सहज विजय मिळवून दिला. आफ्रिकेकडून फक्त कगिसो रबाडा आणि नार्खियां यांनाचा विकेट घेण्यात यश मिळाले. इतर गोलंदाज मात्र अपयशी ठरले. (IND vs SA 1st T20)

तत्पुर्वी, भारताच्या दौऱ्यावर आलेल्या दक्षिण आफ्रिकेला पहिल्या टी २० सामन्यात भारताने अवघ्या १०६ धावांवर रोखले. १०६ धावांच्या मोबदल्यात भारताने आफ्रिकेच्या ८ बळी घेण्यात यश मिळवले. प्रथम गोलंदाजी घेत भारताचा कर्णधार रोहित शर्मा याने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताचा प्रमुख जलद गोलंदाजांनी रोहितचा निर्णय अत्यंत सार्थ ठरवत पहिल्या तीन षटकातच ५ फलंदाजांना तंबुत धाडले. आफ्रिकेच्या पहिल्या सहा मधील चार फलंदाजांना भोपळा देखिल फोडता आला नाही.  (IND Vs SA 1st T20 )

पहिल्या षटकात गोलंदाज दीपक चहर याने कर्णधार टेम्बा बवुमा याला त्रिफळाचित केले. टेम्बा शुन्यावर बाद झाला. त्यानंतर दुसरे षटक अश्रदीप टाकण्यासाठी आला. या षटकातील दुसऱ्या चेंडूवर त्याने अनुभवी क्विंटन डिकॉक याला चित्रफळाचित केले. त्याने केवळ एक धाव केली. पुढील पाचव्या चेंडूवर अश्रदीपने नवा फलंदाज रिली रोसो याला बोल्ड केले. तो शुन्यावर बाद झाला. यानंतर सहाव्या चेंडूवर अश्रदीपने नुकताच मैदानावर उतरलेल्या डेव्हिड मिलर याला पुन्हा शुन्यावर बोल्ड केले. अशा प्रकारे भारताने पहिल्या दोन षटकात ८ धावा देत ४ बळी घेतले. (IND Vs SA 1st T20)

तिसरे षटक टाकण्यासाठी दीपक चहर आला. या षटकातील तिसऱ्या चेंडूवर ट्रिस्टन स्टब्स याने झेल देऊन माघारी परतला. तो देखील शुन्यावर बाद झाला. यांनतर ठराविक अंतरावर भारत आफ्रिकेचे बळी घेत राहिला यामुळे एक प्रकारे आफ्रिकेच्या धावा बनविण्याच्या गतीवर चांगलेच अंकुश ठेवले होते. आफ्रिकेकडून केशव महाराज याने ३५ चेंडूत ४१ धावांचे योगदान दिले. यासह एडन माक्ररम याने २४ चेंडूत २५ धावा आणि वेन पारनेर याने ३७ चेंडूत २४ धावांची खेळी केली. या व्यतिरिक्त कोणालाही मोठी खेळी करता आली नाही. आठ गडी गमावत आफ्रिकेने १०६ धावा बनवल्या. (IND vs SA 1st T20)

भारताकडून अर्शदीप सिंग याने चार षटकात ३२ धावा देत ३ बळी घेतले. दीपक चहरने ४ षटकात २४ धावा देत २ बळी घेतले. यांना हर्षल पटेलने चांगली साथ देत ४ षटकात २६ धावा देत २ बळी घेतले. तर अक्षर पटेलला १ बळी घेण्यात यश आले. त्याने चार षटकात १६ धावा दिल्या.

हेही वाचलंत का?

Back to top button