INDvsAUS 3rd T20 : आजच्या निर्णायक सामन्यावरही पावसाचे ढग?; जाणून घ्‍या हैदराबादमधील हवामान

INDvsAUS 3rd T20
INDvsAUS 3rd T20
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील T-20 मालिकेतील तिसरा सामना आज हैदराबादमध्ये हाेणार आहे.दुसरा T20 सामना पावसामुळे ८ षटकांचा खेळवण्यात आला होता. या सामन्यात भारताने विजय मिळवला होता. आज  हैदराबाद येथे  हाेणार्‍या सामन्यावरही पावसाचे सावट असल्याचा अंदाज accuweather.com या हवामानाचे अपडेट देणाऱ्या संस्थेने व्‍यक्‍त केला आहे. (INDvsAUS 3rd T20)

या मालिकेत दोन्ही संघानी प्रत्येकी एक सामना जिंकला आहे. आता हैदराबादमधील सामना जिंकण्‍याचे लक्ष्‍य ठेवत दाेन्ही संघ मैदानात उतरतील. यामुळे आजचा सामना खूपच रोमांचक होण्याची शक्यता आहे. मात्र, दुसरीकडे आजच्या सामन्यात पाऊस व्यत्यय आणणार की काय, अशी चर्चा आहे. आजचा निर्णायक T20 सामना आजचा सामना वेळेवर सुरू होऊ शकेल का? असे प्रश्न चाहत्यांना पडत आहे. (INDvsAUS 3rd T20)

हैदराबादचे हवामान कसे असेल?

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा T20 सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर संध्याकाळी 7 वाजता सुरु हाेणार आहे. आजच्या सामन्यातही पाऊस पडण्याची शक्यता आहे. ही शक्यता accuweather.com या हवामानचे अपडेट देणाऱ्या संस्थेने व्‍यक्‍त केली आहे. हैदराबादमधील हवामान ढगाळ राहील.  वारे ताशी 19 किमी वेगाने वाहतील. तसेच जवळपास 59% वातावरण ढगाळ राहील आणि पाऊस पडण्याची 50% शक्यता आहे, असा अंदाज या संस्थेने वर्तवली आहे.

नाणेफेक जिंकणार्‍या संघाला अधिक संधी

पावसाचा अंदाज पाहता नाणेफेक जिंकून संघाला प्रथम फलंदाजी करणे योग्य राहील. कारण, हैदराबाद मधील मैदानाची खेळपट्टी फलंदाजीसाठी चांगली मानली जाते. त्यामुळे आजच्या सामन्यात दोन्ही संघांकडून चौकार आणि षटकारांचा पाऊस  पाहायला मिळेल, अशी शक्‍यता व्‍यक्‍त हाेत आहे.

संभाव्‍य भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, रविचंद्रन अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, दीपक हुडा चहर, जसप्रीत बुमराह, उमेश यादव.

संभाव्‍य ऑस्ट्रेलिया संघ : ॲरॉन फिंच (कर्णधार), शॉन ॲबॉट, ॲश्टन अगर, पॅट कमिन्स, टिम डेव्हिड, नॅथन एलिस, कॅमेरॉन ग्रीन, जोश हेझलवूड, जोश इंग्लिस, ग्लेन मॅक्सवेल, केन रिचर्डसन, डॅनियल सॅम्स, स्टीव्ह स्मिथ, मॅथ्यू वेड, ॲडम झाम्पा.

हेही वाचा;

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news