

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा – काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवीत असलेले केरळमधील पक्षाचे खासदार शशी थरूर हे येत्या शुक्रवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, प्रस्तावक पूर्ततेसाठी थरूर यांनी विविध राज्यांतील पक्षाच्या प्रतिनिधींशी संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे.
काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठीची अधिसूचना 22 सप्टेंबर रोजी काढण्यात आली होती. 24 ते 30 सप्टेंबर हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा कालावधी आहे. 17 ऑक्टोबर रोजी अध्यक्षपदासाठी मतदान होणार असून, 19 ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर केला जाणार आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत हेही अध्यक्षपदाची निवडणूक लढविणार आहेत.
निवडणूक लढविण्याच्या दृष्टीने शशी थरुर यांनी अर्जाचे पाच सेट तयार केले आहेत. यासाठी प्रस्तावक म्हणून त्यांना 50 डेलीगेट्स अर्थात प्रतिनिधींची गरज भासणार आहे. दोन किंवा त्यापेक्षा जास्त उमेदवार रिंगणात राहिले तर 17 तारखेला निवडणूक घ्यावी लागेल. एकच उमेदवार रिंगणात राहिला तर मात्र ही निवडणूक बिनविरोध पार पडेल.
हेही वाचा :