अमरावती रुग्णालय दुर्घटनेचा चोवीस तासांत अहवाल द्या : उपमुख्यमंत्र्यांचे आदेश | पुढारी

अमरावती रुग्णालय दुर्घटनेचा चोवीस तासांत अहवाल द्या : उपमुख्यमंत्र्यांचे आदेश

अमरावती; पुढारी वृत्तसेवा : जिल्हा स्त्री रूग्णालयातील नवजात शिशु अतिदक्षता केंद्रातील आगीच्या घटनेबाबत २४ तासांत चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्याकडून समिती स्‍थापन करण्‍यात आली आहे.

जिल्हा स्त्री रूग्णालयातील शिशु दक्षता केंद्रात व्हेंटिलेटर मशिनला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. व्यवस्थापनाने अग्निशमन दलाच्या मदतीने आग आटोक्यात आणली. केंद्रातील १२ नवजात बालकांना तातडीने विशेष संदर्भ रूग्णालय व इतर रूग्णालयात हलविण्यात आले. घटनेत कोणीही जखमी नाही किंवा कोणतीही जीवितहानी नाही.

घटनेबाबत माहिती मिळताच उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी तत्काळ जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्याशी दूरध्वनीद्वारे चर्चा केली. याप्रकरणी समिती स्‍थापन करून चौकशी करावे. याचा अहवाल २४ तासांत सादर करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतंत्र आदेश निर्मगित करून जिल्हा शल्यचिकित्सकांच्या अध्यक्षतेखाली समिती स्‍थापन केली आहे. अमरावतीचे तहसीलदार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, महापालिकेचे अग्निशमन अधिकारी, स्त्री रूग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक आदी समितीचे सदस्य आहेत. समितीने चोवीस तासांत चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश देण्‍यात आले आहेत.

हेही वाचलंत का ? 

Back to top button