

पुढारी ऑनलाईन डेस्क : सध्या भारतीय क्रिकेट संघात 'फिनिशर'ची भूमिका बजावत असलेला दिनेश कार्तिक म्हणतो की तो मोठे फटके खेळण्यासाठी खूप सराव करतो, सरावासोबत काही गोष्टींवर लक्ष केंद्रित करतो, ज्यामुळे त्याला दबावाच्या परिस्थितीतही मोठे फटके खेळण्यास मदत होते. अशीच काहीशी परिस्थिती शुक्रवारी (दि.२३) रात्री ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात निर्माण झाली होती. तेव्हा भारताला शेवटच्या सहा चेंडूत नऊ धावांची गरज होती. तेव्हा ही मोठे फटकेबाजी करत दिनेशने सामना संपवला होता.
कार्तिकला त्याच्या फटकेबाजी करण्याच्या तयारीबद्दल विचारले असता त्याने सांगितले की, नेट प्रॅक्टिसमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण करून सराव करत असतो. पुढे म्हणाला, "मी खूप दिवसांपासून मोठे फटके मारण्याचा सराव करत आहे. हा माझ्या दैनंदिन दिनक्रमाचा भाग आहे. या सरावामध्ये राहुल द्रविड आणि विक्रम राठोड हे मला मदत करतात. मी जास्त सरावासोबत काही गोष्टींवर लक्ष केंद्रित करतो. असे ही तो म्हणाला.
रोहित जगातील महान खेळाडू
काल झालेल्या सामन्याबद्दल दिनेश म्हणाला, कर्णधार रोहित शर्माने चांगली फलंदाजी केली. खेळपट्टीवर खेळण्यास उतरल्या उतरल्या मोठे फटके खेळणे सोपे नव्हते. यावरून तो केवळ भारतातीलच नव्हे तर जगातील महान खेळाडू का आहे हे दिसून येते. अलीकडच्या काळात धडाकेबाज फलंदाजी करणाऱ्या हार्दिक पांड्याचेही त्याने कौतुक केले.
हेही वाचा;