तिकीट विक्रीत काळाबाजार झालेला नाही : मोहम्मद अझरुद्दीन | पुढारी

तिकीट विक्रीत काळाबाजार झालेला नाही : मोहम्मद अझरुद्दीन

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील रविवारी (25 सप्टेंबर) हैदराबादमधील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर सामना होण्याआधी तिकीट विक्रीमध्ये काळाबाजार झाला, अशा बातम्या आल्या होत्या. त्यानंतर तिकीट विक्रीदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत अनेक जण जखमी झाले. आता हैदराबाद क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि माजी भारतीय कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यांनी आपली बाजू मांडली आहे.

मोहम्मद अझरुद्दीन म्हणाला की, हैदराबाद क्रिकेट असोसिएशनने काहीही चुकीचे केलेले नाही. या घटनेबद्दल त्यांनी शोकही व्यक्त केला. राज्य क्रिकेट असोसिएशनही जखमींना मदत करेल, असेही अझरुद्दीने सांगितले. एका कंपनीला या सामन्याची ऑनलाईन आणि ऑफलाईन तिकिटे विकण्याचे काम सोपवण्यात आले आहे. तिकीट विक्रीमध्ये कोणताही काळा बाजार झालेला नाही. जर कोणी केला असेल तर त्याच्यावर कडक कारवाई करू. एखाद्याने ऑनलाईन तिकीट खरेदी करून ते काळा बाजार करून विकले असेल तर त्याच्याशी एचसीएचा काहीही संबंध नाही.

अझरुद्दीनने गुरुवारची घटना दुर्दैवी असल्याचे म्हटले. हैदराबादला बर्‍याच काळानंतर आंतरराष्ट्रीय सामना आयोजित केला आहे. त्यामुळे अनेक लोक स्टेडियममध्ये सामना पाहण्यासाठी उत्सुक आहेत. एचसीएचे सचिव विजयानंद यांनी सांगितले की, घटनेबाबत युनियनने एक समिती स्थापन केली असून जखमींना मदत करेल.

Back to top button