पुढारी ऑनलाईन डेस्क : ऑस्ट्रेलियात होणाऱ्या T20 विश्वचषकासाठी न्यूझीलंडने आपला संघ जाहीर केला आहे. संघात तीन बदल करण्यात आले आहेत. लॉकी फर्ग्युसन, मायकेल ब्रेसवेल आणि फिन ऍलन यांच्या जागी संघात काईल जेमिसन, टॉड ॲस्टल आणि टिम सेफर्ट यांचा समावेश करण्यात आला आहे. (T20 World Cup) 2021 मध्ये टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत किवी संघ पोहोचला होता, केन विल्यमसनच्या संघाला विजेतेपदाच्या सामन्यात ऑस्ट्रेलियालाकडून पराभवाला सामोरे जावे लागले होते.
संघाचा सलामीवीर फलंदाज मार्टिन गप्टिल देशासाठी सातवा टी-२० विश्वचषक खेळणार आहे. नॅथन मॅक्क्युलम आणि रॉस टेलर या खेळाडूंनी सहा वेळा टी-२० विश्वचषकात खेळले आहेत. लॉकी फर्ग्युसन दुखापतीमुळे विश्वचषक २०२१ मध्ये खेळू शकला नव्हता. त्याच्या जागीन ॲडम मिल्नेचा संघात समावेश करण्यात आला होता. यंदाही त्याने संघात आपले स्थान कायम ठेवले आहे. डेव्हॉन कॉनवेचा यष्टीरक्षक म्हणून संघात समावेश करण्यात आला आहे. (T20 World Cup)
गेल्या वर्षी विश्वचषक संघात सामील झालेला काईल जेमिसन पाठीच्या दुखापतीतून सावरला असूनही त्याला संघात स्थान देण्यात आलेले नाही. याशिवाय टॉड ॲस्टल आणि टिम सेफर्ट यांना संघातील स्थान राखता आले नाही. विश्वचषकापूर्वी न्यूझीलंडचा संघ पाकिस्तान आणि बांगलादेशसोबत तिरंगी मालिका खेळणार आहे.
न्यूझीलंडचे प्रशिक्षक गॅरी स्टीड म्हणाले की, "विश्वचषक संघाची घोषणा करण्याची ही वेळ नेहमीच खास असते आणि आज निवडलेल्या १५ खेळाडूंचे मला अभिनंदन करायचे आहे.
T20 विश्वचषकसाठी न्यूझीलंड संघ
केन विल्यमसन (कर्णधार), फिन ऍलन, ट्रेंट बोल्ट, मायकेल ब्रेसवेल, मार्क चॅपमन, डेव्हॉन कॉनवे (विकेटकिपर), लॉकी फर्ग्युसन, मार्टिन गुप्टिल, अॅडम मिल्ने, डॅरिल मिशेल, जिमी नीशम, ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, ईश सोधी, टिम साउदी
हेही वाचा;