हा रस्ता का? छे. हो…घसर गुंडी, टाकळीमानूर-करोडी रस्त्याची दुर्दशा; 18 किलोमीटरचा रस्ता अत्यंत धोकादायक

हा रस्ता का? छे. हो…घसर गुंडी, टाकळीमानूर-करोडी रस्त्याची दुर्दशा; 18 किलोमीटरचा रस्ता अत्यंत धोकादायक
Published on
Updated on

पाथर्डी तालुका, पुढारी वृत्तसेवा: काही दिवसांपासून जिल्ह्यात संततधार सुरू असून, यामुळे पहिलेच र्दुदशा झालेल्या रस्त्यांच्या खड्ड्यांमध्ये पाणी साचत आहे, तर काही रस्ते चिखल पाण्यामुळे निसरडे निर्सडे झाले आहेत. त्यामुळे, 'छे.हो.ऽऽ..हा रस्ता, नाही नाही ही तर घसर गुंडी,' असे नागरिक म्हणंत आहेत.

तालुक्यातील राजकीय द़ृष्ट्या महत्त्वाच्या असणारा टाकळीमानूर, तिनखडी, करोडी गावांना जोडणारा 18 किलोमीटरचा मुख्य रस्ता अत्यंत धोकादायक बनला असून, करोडी ते टाकळीमानूर रस्त्याची दुरावस्था झाली आहे. या ठिकाणी डांबरी रस्ता होता की, नाही हेच आता कळत नाही. रस्त्याला मोठ-मोठे खड्डे पडले असून, हा रस्ता नागरिकांसाठी मृत्यूचा सापळा बनला आहे.

संततधार पावसामुळे या रस्त्याची अवस्था बिकट झाली आहे. कधी काळी अस्तित्वात असणारा डांबरी रस्ता मातीमोल झाला. खराब रस्त्यामुळे दुचाकीस्वरांना या मार्गावरून जाताना तारेवरची कसरत करावी लागते. एसटी बस वाहतूक सध्या रस्त्याच्या कारणास्तवरून अत्यल्प सुरू आहे. खासगी वाहन प्रवासी वाहतूक ही रस्त्यामुळे पूर्णतः बंद आहे.

या रस्त्याची तत्काळ दुरुस्ती न केल्यास एखादी मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या रस्त्यामुळे दोघांना आपला जीव गमवावा लागला आहे. रस्त्याचे अस्तित्व न राहिल्याने हा रस्ता रात्रीच्या वेळी अत्यंत धोकादायक बनला आहे. मोठी वाहने चालकांना जीव धोक्यात घालून या रस्त्याने प्रवास करावा लागतोय.

'लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे'

सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने, त्याचबरोबर मोबाईल कंपन्यांनी साईड पट्ट्यावर केबल टाकण्यासाठी खोदलेल्या नालीमुळे संपूर्ण माती रस्त्यावर येऊन चिडचिड होऊन हा रस्ता निसरडा बनला असून, धोकादायक बनलाय. रस्त्याची दुरावस्था पाहून रस्त्याची गुणवत्ता व देखभाल दुरुस्ती करणार्‍या संबंधित विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण होतो. रस्त्याची अवस्था पाहून सर्वपक्षीय नेत्यांनो-पदाधिकार्‍यांनो या रस्त्याकडे पहा, अशी म्हणन्याची वेळ नागरिकांवर आली आहे.

दुचाकी घसरून अनेक जखमी

सध्या दुचाकी शिवाय पर्याय नाही. दुचाकीवरून घरातील महिलांना घेऊन जाणे म्हणजे साक्षात मृत्यूच्या दरवाजातून ये-जा करण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. खड्ड्यातून वाट काढताना अनेक वेळा चालकांची व दुचाकीस्वरांची तारांबळ उडते. याच रस्त्यात खड्ड्यांमुळे घसरून पडल्याचे अनेक वेळा नागरिक जखमी झाले आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news