नगर, पुढारी वृत्तसेवा: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाची तळागाळात पक्ष बांधणी सुरू आहे. तालुकास्तरावर कार्यकारिणी निवड सुरू आहे. मुंबई येथे शिवतीर्थावर दसरा मेळाव्याला नगर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचे नियोजन केले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर मंत्री शंभुराज देसाई 21 सप्टेंबर रोजी नगरला येणार आहेत, अशी माहिती खासदार सदाशिव लोखंडे यांनी दिली.
शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, नगर शहरात एका विवाहित महिलेली तरुणाने छेड काढली. दुचाकीवर बस नाहीतर तुझ्या अंगावर अॅसिड टाकील, अशी धमकी दिली. त्या आरोपीवर कडक कारवाई करावी, अशी मागणी पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे केली आहे. तसेच, काही तरुणांवर दाखल झालेल्या गुन्ह्यांचा सखोल तपास करून सत्य तपासावे, अशीही मागणी केली आहे. मुख्यमंत्री शिंदे गटाकडून पक्ष बांधणी सुरू आहे. दसर्याला मुंबई येथे मोठा मेळावा होणार आहे. त्या मेळाव्यासाठी नगर शहरातून आणि जिल्ह्यातून किती तरुण जाणार याचे नियोजन सुरू आहे. काही तालुक्यात कार्यकारिणी तयार करण्यात आली आहे. तर, काही तालुक्यांमध्ये तालुकाप्रमुख पदासाठी दोन ते तीन नावे आल्याने तेथील निवड लांबणीवर गेल्या आहेत. लवकरच त्या निवडी जाहीर करण्यात येतील. पक्ष बांधणीबरोबर जनतेच्या अडचणी सोडविण्याचे महत्त्वाचे आहे. त्यासाठी मुख्यमंत्री दिवसरात्र एक करीत आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस लवकरच महाराष्ट्राच्या दौर्यावर आहेत. ते 182 गावांच्या पाणीयोजनेचे जलपूजन करणार आहेत. तसेच, श्री येथे साई बाबांच्या दर्शनासाठी येणार आहेत, असेही खासदार लोखंडे म्हणाले.