IPL Impact Player Rule : बीसीसीआयकडून ‘आयपीएल’च्या नियमात मोठे बदल

IPL Impact Player Rule : बीसीसीआयकडून ‘आयपीएल’च्या नियमात मोठे बदल
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : टी-२० क्रिकेटमधील रंजकता अधिक वाढवण्यासाठी बीसीसीआय देशाअंर्तगत होणाऱ्या क्रिकेट सामन्यासाठी 'इम्पॅक्ट प्लेयर' हा नवा नियम आणण्याच्या तयारीत आहे. नव्या नियमानुसार, सामन्यात ११ ऐवजी १५ खेळाडू खेळू शकतात. या नियमाचा वापरकरून प्लेइंग-११ मधील एक खेळाडू बदलला जाऊ शकतो. जाणून घ्या काय आहे नियम. (IPL Impact Player Rule)

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) आता नवीन नियम लागू करण्याच्या तयारीत आहे. हा नियम आल्यास ११ ऐवजी १५ खेळाडू सामन्यात खेळण्यास पात्र असतील. या नियमांच्या चाचणीसाठी, तो प्रथम देशांतर्गत क्रिकेटमध्येच लागू केला जाईल. बीसीसीआय ११ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या टी – २० सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीपासून हा नवीन नियम लागू करू शकते. (IPL Impact Player Rule)

देशांतर्गत क्रिकेटमध्ये चाचणी घेतल्यानंतर, पुढील वर्षीच्या आयपीएल २०२३ हंगामातही हा 'इम्पॅक्ट प्लेयर' नियम लागू केला जाऊ शकतो. हा नियम 'एक्स फॅक्टर' नावाने ऑस्ट्रेलियन टूर्नामेंट बिग बॅश लीग (BBL) मध्ये लागू आहे. मात्र, तेथे १५ ऐवजी १३ खेळाडूंना खेळण्याची परवानगी आहे.

बीसीसीआयने परिपत्रक जारी केले

बीसीसीआयने सर्व राज्यांना परिपत्रक पाठवले आहे. त्यात म्हटले आहे की, 'टी-२० क्रिकेटची वाढती लोकप्रियता लक्षात घेऊन आता काहीतरी नवीन आणण्याची तयारी केली जात आहे, ज्याद्वारे चाहत्यांसाठी व खेळाडूंसाठी क्रिकेट अधिक मनोरंजक बनवता येईल. यामध्ये कोणत्या प्रकारचे नियम असतील, हेही परिपत्रकात सांगण्यात आले आहे.

काय आहे 'इम्पॅक्ट प्लेयर' नियम?

१) टॉसच्या वेळी संघाला (कर्णधाराला) प्लेइंग-११ खेळाडू सांगावे लागतील त्या सोबतच ४ अन्य खेळाडूंची नावेही पर्याय म्हणून द्यावी लागतील. या चार खेळाडूंपैकी कोणताही एक खेळाडू 'इम्पॅक्ट प्लेयर' नियमांतर्गत प्लेइंग-११ मध्ये असलेल्या खेळाडूद्वारे बदलला जाऊ शकतो.'

२) प्लेइंग-११ मधून बदललेला खेळाडू पुन्हा मैदानामध्ये येऊ शकणार नाही. त्या खेळाडूला क्षेत्ररक्षणही करता येणार नाही.

३) जर एखाद्या गोलंदाजाचा 'इम्पॅक्ट प्लेअर' म्हणून समावेश केला असेल, तर तो फक्त त्याची पूर्ण ४ षटकेच टाकू शकेल. बदलेल्या गोलंदाजाने किती षटके टाकली याचा परिणाम त्या 'इम्पॅक्ट खेळाडू'वर होणार नाही.

४) मात्र, संघ, कर्णधार किंवा व्यवस्थापनाला एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल. 'इम्पॅक्ट प्लेयर' नियम वापरण्यापूर्वी त्यांना फील्ड अंपायर किंवा चौथ्या अंपायरला याबद्दल माहिती देणे महत्वाचे आहे.

५) बीसीसीआयच्या नियमानुसार, सामन्यादरम्यान दोन्ही संघ डावाच्या १४ व्या षटकाच्या आधी 'इम्पॅक्ट प्लेयर' नियमाचा वापर करू शकतील. म्हणजेच १४ व्या षटकानंतर संघाला या नियमाचा वापर करता येऊ शकणार नाही,

बिग बॅश लीगमध्ये 'एक्स फॅक्टर' नियम

ऑस्ट्रेलियन टूर्नामेंट बिग बॅश लीगमधील 'इम्पॅक्ट प्लेअर' प्रमाणेच 'एक्स फॅक्टर' नियम दीर्घकाळापासून लागू आहे. या 'एक्स फॅक्टर' नियमानुसार १५ ऐवजी १३ खेळाडूंना खेळण्याची परवानगी आहे. या नियमामध्ये संघ पहिल्या डावातील १० व्या षटकाआधी संघ खेळाडू बदलू शकतात.

हेही वाचा;

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news