

पुढारी ऑनलाईन डेस्क : टी-20 विश्वचषक स्पर्धेतील सहभागी देश आपले संघ जाहीर करत आहेत. यामध्ये भारत, पाकिस्तान, बांग्लादेश, अफगानिस्तान, वेस्ट इंडि़ज या व इतर देशांनी आपला संघ जाहीर केला आहे. या संघाच्या यादीमध्ये आता श्रीलंकेचा समावेश झाला आहे. श्रीलंकेने शुक्रवारी टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी आपला संघ जाहीर केला आहे. ( T20 World Cup )
श्रीलंकेच्या संघाने नुकतीच आशिया चषक स्पर्धा जिंकली. या स्पर्धेतील जवळपास सर्वच खेळाडूंची टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी निवड झाली आहे. वेगवान गोलंदाज चमीरा अद्याप दुखापतग्रस्तच आहे. त्याला संघात स्थान देण्यात आले आहे. मात्र स्पर्धेपूर्वी ताे फीट हाेणे आवश्यक आहे. अशीच काहीशी परिस्थिती लाहिरु कुमाराचीही आहे. वेगवान गाेलंदाज मधुशंका, प्रमोद मदुशन आणि चमिका करुणारत्ने यांना संघात स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे चमीरा आणि लाहिरू कुमार हे फिटनेस टेस्टमध्ये अपात्र ठरल्यास पर्यायी खेळाडूची संघात वर्णी लागू शकते.
आशिया कप स्पर्धेत श्रीलंकेच्या भानुका राजपक्षे, वेगवान गाेलंदाज मधुशंका, अष्टपैलू वानिंदू हसरंगा यांनी चमकदार कामगिरी केली. हचरंगा याने स्पर्धेत 66 धावा केल्या आणि 9 विकेट्स घेतल्या. ताेच अंतिम सामन्यात सामनावीर ठरला हाेता. आशिया चषक पटकावल्यामुळे श्रीलंकेचा आत्मविश्वास दुणावला आहे. याच आत्मविश्वासाने हा संघ टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी मैदानात उतरेल.
दासुन शनाका (कर्णधार), दानुष्का गुनाथिलका, पथुम निसांका, कुसल मेंडिस, चरित अस्लंका, भानुका राजपक्षे, धनंजय डी सिल्वा, वनिंदू हसरंगा, महेश तिक्षा, जेफ्री वांडरसे, चमिका करुणारत्ने, दुष्मंता चमिरा, लहिला कुमार, लहिरुस
अशेन बंदारा, प्रवीण जयविक्रम, दिनेश चंडिमल, बिनुरा फर्नांडो, नुवानिंदू फर्नांडो
हेही वाचा :