US Open 2022 | टेनिस जगताला मिळाला सर्वात तरुण नंबर वन, स्पेनच्या १९ वर्षीय कार्लोस अल्काराझची 'अमेरिकन ओपन'‍‍‍‍‍‍‍‍‍ जेतेपदावर मोहोर | पुढारी

US Open 2022 | टेनिस जगताला मिळाला सर्वात तरुण नंबर वन, स्पेनच्या १९ वर्षीय कार्लोस अल्काराझची 'अमेरिकन ओपन'‍‍‍‍‍‍‍‍‍ जेतेपदावर मोहोर

न्यूयॉर्क : स्पेनच्या १९ वर्षीय कार्लोस अल्काराझ (Carlos Alcaraz) याने पुरुष एकेरीत अमेरिकन ओपन स्पर्धा (US Open 2022) जिंकत एटीपी रँकिंगमध्ये अव्वल स्थान पटकावले. त्याचे हे पहिले ग्रँडस्लॅम विजेतेपद आहे. अमेरिकन ओपनच्या अंतिम फेरीत त्याने नॉर्वेच्या कॅस्पर रुडवर ६-४, २-६, ७-६(१) असा विजय मिळवला. अवघ्या १९ व्या वर्षी अशी कामगिरी करणारा कार्लोस अल्काराझ हा टेनिस जगतातील सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे.

“जगात अव्वल स्थान पटकवण्याचे आणि ग्रँड स्लॅम जिंकण्याचे मी लहानपणापासूनच स्वप्न पाहत होतो,” असे अल्काराझने टेनिस कोर्टवर दिलेल्या मुलाखतीत म्हटले. १९७३ मध्ये एटीपी रँकिंग सुरू झाले आणि आता एटीपी रँकिंगच्या इतिहासात जगात नंबर बनलेला अल्काराझ हा जगातील सर्वात तरुण खेळाडू आहे. त्याने लेटन हेविटचा विक्रम मोडला आहे. लेटन हेविटने २० व्या वर्षी २००१ मध्ये जगात अव्वल स्थान पटकावले होते.

अल्काराझचा अमेरिकन ओपनमधील (US Open 2022) विजेतेपदाचा मार्ग कठीण होता. त्याला चौथ्या फेरीत मारिन सिलिकला पराभूत करण्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागली. तिसऱ्या मानांकित अल्कराझचा उपांत्य फेरीत २२व्या मानांकित अमेरिकेच्या फ्रान्सिस टियाफो याच्याशी सामना झाला होता. अल्कराझने उपांत्य फेरीतील सामन्यात ६-७ (६-८), ६-३, ६-१, ६-७ (५-७), ६-३ असा विजय मिळवला होता.

फ्रेंच ओपन फायनलिस्ट असलेला रुड आता सातव्या क्रमांकावरून जगात दुसऱ्या क्रमांकावर पोहोचेलाय. रविवारी झालेला अमेरिकन ओपनचा अंतिम सामना हा दोन खेळाडूंसाठी त्यांच्या पहिल्या ग्रँडस्लॅम विजेतेपदासाठी आणि जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान मिळवण्यासाठी होता. पण अंतिम फेरीत स्पेनच्या १९ वर्षीय कार्लोस अल्काराझने बाजी मारत जगात अव्वल स्थानी झेप घेतली.

अल्काराझने चौथ्या सेटमध्ये रुडचा पराभव करण्यासाठी फोरहँडचा प्रभावी वापर केला आणि विजयावर शिक्कामोर्तब केले. अल्काराझने प्रथमच ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावले आहे. तरी रुडची दुसऱ्यांदा जेतेपदाची लढत होती.

हे ही वाचा :

Back to top button