Australian Open 2022 : ऐतिहासिक… नदालची ऑस्‍ट्रेलियन ओपनवर मोहर, २१व्‍या ग्रँडस्लॅम जेतेपदाला गवसणी | पुढारी

Australian Open 2022 : ऐतिहासिक... नदालची ऑस्‍ट्रेलियन ओपनवर मोहर, २१व्‍या ग्रँडस्लॅम जेतेपदाला गवसणी

पुढारी ऑनलाईन डेस्‍क

अत्‍यंत अटीतटीच्‍या अंतिम सामन्‍यात बाजी मारत स्‍पेनचा स्‍टार टेनिसपटू राफेल नदाल याने ऑस्‍ट्रेलियन ओपन ट्रॉफीवर ( Australian Open 2022 ) आपली मोहरी उमटवली. तब्बल साडेपाच तास चाललेल्या अंतिम सामन्यात रशियाच्‍या दानिल मेदवेदेव याचा पराभव करत नदालने पुरुष एकेरीत 21 वे ग्रँडस्लॅम जेतेपदला गवसणी घातली आहे. अशी कामगिरी करणारा तो पहिला टेनिसपटू ठरला आहे.

Australian Open 2022 : दोन सेटनंतर नदालचे कमबॅक

ऑस्‍ट्रेलियन ओपनचा ( Australian Open 2022 ) अंतिम सामन्‍यामध्‍ये दानिल मेदवेदेव आणि राफेल नदाल यांनी आपल्‍या कामगिरीला साजेसा खेळ केला. दानिल मादेववेदेव याने ६-२, ६-७ असे सलग दोन सेट जिंकले. मात्र तिसर्‍या सेटमध्‍ये नदाल याने कमबॅक केले. त्‍याने उत्‍कृष्‍ट खेळीचे प्रदर्शन तिसरा सेट ६-४ असा जिंकला.

चौथ्‍या सेटमध्‍ये दोन गेम बरोबरीत असताना तिसर्‍या गेमसाठी दोघांनीही सर्वोत्‍कृष्‍ट खेळीचे प्रदर्शन करत चाहत्‍यांची मने जिंकली. नदालने मेदवेदेवची सर्व्हिस ब्रेक करत तिसरा गेम आपल्‍या नावावर करत आघाडी घेतली. आपली सर्व्हिस कायम ठेवत चौथा गेम सहज आपल्‍या नावावर केला. यानंतर ६-४ ने चोथा सेट जिंकत सामन्‍यातील आपले आव्‍हान कायम ठेवले.

फायनल सेटमध्‍ये दाेघांकडूनही जिगरबाज खेळीचे प्रदर्शन

फायनल सेटमध्‍ये दोन-दोन गेम बरोबरी करत दोघांनीही आपल्‍या सर्व्हिस कायम ठेवल्‍या. तिसर्‍या गेममध्‍ये नदालने मेदवेदेवची सर्व्हिस ब्रेक करत आघाडी घेतली. यानंतर मदेवेदेवने नदालची सर्व्हिस ब्रेक करत पाच – पाच अशी बराेबरी केली.  दाेघांनीही जिगरबाज खेळीचे प्रदर्शन करत चाहत्‍यांची मने जिंकली.  अखेर नदालने फायलन सेट ७-५ असा जिंकत ऑस्‍ट्रेलियन ओपन ट्रॉफीवर आपले नाव कोरले.

गेल्या वर्षी विम्बल्डन स्पर्धा संपल्यावर पुरुष एकेरीत 21 वे ग्रँडस्लॅम जेतेपद कोण मिळवणार यावर चर्चा सुरू होती. 2022 मधील पहिला ग्रँडस्लॅम खेळत असलेला नदाल इतिहास रचण्यापासून एक पाऊल दूर होता. त्‍याने अंतिम सामन्‍यात दोन सेटनंतर गेममध्‍ये कमबॅक करत ऑस्‍ट्रेलियन ओपनवर आपले नाव कोरले.

त्‍याचबरोबर २१ वे ग्रँडस्‍लंम जेतेपद पटकाणारा जगातील पहिला टेनिसपटू होण्‍याची ऐतिहासिक कामगिरीही आपल्‍या नावावर केली.

 

Back to top button