क्रिकेटपटू अर्शदीप याच्‍या विकिपीडिया प्रोफाइलशी छेडछाड, नावासमोर ‘खलिस्‍तान’ शब्‍द जोडला! | पुढारी

क्रिकेटपटू अर्शदीप याच्‍या विकिपीडिया प्रोफाइलशी छेडछाड, नावासमोर 'खलिस्‍तान' शब्‍द जोडला!

नवी दिल्‍ली : पुढारी वृत्तसेवा : पाकिस्‍तान विरुद्‍धचा सामना पराभूत झाल्‍यानंतर टीम इंडियातील खेळाडूंच्‍या सुमार कामगिरीवर जोरदार टीका होत आहे. या सामन्‍यात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंह यांनी सोपा झेल सोडल्‍याने तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल होत आहे. त्‍याच्‍या विकिपीडिया पेजवरील प्रोफाईल एडिट करुन खलिस्‍तान हा शब्‍द जोडण्‍यात आला आहे. याची गंभीर दखल केंद्र सरकारने घेतली असून माहिती व माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने विकिपीडियाच्‍या अधिकार्‍यांना समन्‍स जारी करुन संबंधितांवर कारवाई करुन याप्रकरणी स्‍पष्‍टीकरण द्‍यावे, असे स्‍पष्‍ट केले आहे.

रविवारी पाकिस्‍तान विरुद्‍धच्‍या सामन्‍यावेळी २३ वर्षीय अर्शदीप सिंह याने पाकिस्‍तानचा फलंदाज आसिफ अली याचा झेल सोडला होता. त्‍याचया या सुमार कामगिरीवर सोशल मीडियावर जोरदार टीका होत आहे. तसेच त्‍याला काही सवालही करण्‍यात येत आहेत. यानंतर त्‍याच्‍या विकिपीडिया पेजवर खलिस्‍तान हा शब्‍द जोडण्‍यात आला आहे. पेजवर २०१८ अंडर १९ क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये खलिस्तान टीममधून अर्शदीपने पदार्पण केले. जुलै २०२२ मध्‍ये तो खालिस्‍तानमतधून आशिया चषक स्‍पर्धेत आल्‍याचे लिहले आहे.

विकिपीडियावर हा प्रकार कसा घडला, असा सवाल करत पाकिस्‍तान आणि आयएसआयकडून चालविल्‍य जाणार्‍या खलिस्‍तान ट्रेंडचा भाजप नेते मनजिंदर सिंह यांनी तीव्र निषेध केला आहे. या प्रकरणाचा मी तीव्र निषेध करतो. प्रत्‍येक भारतीय हा अर्शदीपसोबत आहे. भारत आणि शीख समाजात फूट पाडण्‍याचा हा पाकिस्‍तानचा नापाक प्रयत्‍न कधीच यशस्‍वी होणार नाही, असेही त्‍यांनी म्‍हटले आहे.

हेही वाचा : 

 

 

Back to top button