पुढारी ऑनलाईन डेस्क : आशिया कप स्पर्धेची सुरूवात २८ ऑगस्टपासून होत आहे. ही स्पर्धा यूएईमध्ये होणार आहे. २८ ऑगस्ट रोजी भारताचा पहिला सामना प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होणार आहे. आशिया कप २०२२ स्पर्धेचा प्रबळ दावेदार भारताला मानले जात आहे. भारतीय संघाकडे असे 2 खेळाडू आहेत, ज्यांच्यात आशिया कप २०२२ मध्ये सामना फिरवण्याची ताकद आहे. ते खेळाडू भारताला चषकापर्यंत नेऊ शकतो. टीम इंडियाला आशिया चषक 2022 ची चषक जिंकून देणारे ते 2 खेळाडू कोण आहेत पाहू या…(Asia Cup 2022)
१) हार्दिक पंड्या – आशिया कप २०२२ मध्ये हार्दिक पांड्या भारतासाठी मॅचविनर खेळाडू ठरू शकतो. आशिया चषक २०२२ मध्ये हार्दिक पांड्या मोठी भूमिका बजावू शकतो. एखादी मोठी स्पर्धा जिंकायची असते तेव्हा नेहमी संघासोबत शेवटपर्यंत टिकून राहणाऱ्या खेळाडूंची गरज असते. असा खेळाडू म्हणून हार्दिक पांड्याकडे बघितले जात आहे. हार्दिक गोलंदाजी आणि फलंदाजी या दोन्ही बाबतीत सर्वोत्तम आहे. संघाला वेगवान धावांची गरज असताना हार्दिककजे पाहिले जाते. फलंदाजी करताना मैदानाच्या प्रत्येक कोपऱ्यात धावा काढण्याची क्षमता हार्दिक पांड्यामध्ये आहे.(Asia Cup 2022)
२) सुर्यकुमार यादव – सूर्यकुमार यादवच्या रूपाने भारताला स्फोटक फलंदाज मिळाला आहे. तो मैदानात ३६० अंशाच्या कोनात चौकार-षटकार मारन्यात पटाईत आहे. आशिया चषक 2022 साठी सूर्यकुमार यादव खूप महत्त्वाचा आहे. एबी डिव्हिलियर्स ज्या पद्धतीने फलंदाजी करायचा त्याच पद्धतीने अनेक प्रकारचे फटके मारायचा तसाच सूर्यकुमार यादव खेळत आहे. सूर्यकुमारला मैदानाभोवती अनेक शॉट्स खेळून धावा काढण्याची कला अवगत आहे. त्याच्या या अनोख्या फलंदाजीच्या शैलीमुळे सूर्याला 360 डिग्री खेळाडू म्हणून ओळखले जाते. सूर्यकुमार यादवकडे डाव हाताळण्याची तसेच सामना संपवण्याची दुहेरी क्षमता आहे. सूर्यकुमार यादवला भारताचा एबी डिव्हिलियर्स म्हटले जाते.