

पुढारी ऑनलाईन डेस्क : आशिया चषक स्पर्धेतील पाकिस्तान विरुद्च्या सामन्याला अवघे चार दिवस राहिले असताना मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांना कोरोनाची लागण झाली आहे. यासंदर्भातील माहिती 'बीसीसीआय'चे सचिव जय शहा यांनी आज दिली. राहुल द्रविड हे सध्या विलगीकरणात आहेत. त्यांच्या गैरहजरीत आता पारस म्हाब्रे मुख्य प्रशिक्षक म्हणून जबाबदारी स्वीकारतील.
आशिया कप स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट संघ आज दुबईला रवाना होईल. मात्र द्रविड यांना कोरोनाचा लागण झाल्याने संघाच्या अडचणीत भर पडली आहे. आता राहुल द्रविड यांच्या विनाच भारतीय संघाला सराव करावा लागणार आहे. यापूर्वी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह हा दुखापतग्रस्त असल्याने टीमच्या बाहेर आहे. अशातच राहुल द्रविड यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे टीम इंडियाची रणनीती आखणे अवघड होईल, असे मानले जात आहे.
द्रविड यांच्या गैरहजरीत व्हीव्हीएस लक्ष्मण टीम इंडियाचे प्रशिक्षक होणार का, याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. द्रविड यांच्या गैरहजरीत अनेकवेळा व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी प्रशिक्षणपदाची जबाबदारी घेतली आहे. नुकत्याच झालेल्या झिम्बाब्वे दौर्यावेळी द्रविड यांना विश्रांती देण्यात आली होती. लक्ष्मण हे आर्यलंड विरुद्धच्या दोन टी-२० सामन्यासाठी प्रशिक्षक होते. आयपीएलमध्ये त्यांनी हैदराबाद संघाचे मँटरमधून भूमिका बजावली आहे. तसेच आजपर्यंत पाच आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये त्यांनी प्रशिक्षक म्हणून भूमिका बजावली आहे.
हेही वाचा :