England Tour of Pakistan : इंग्लंडचा संघ 17 वर्षांनी पाकिस्तान दौ-यावर जाणार, T20 मालिकेच्या शेड्यूलची घोषणा | पुढारी

England Tour of Pakistan : इंग्लंडचा संघ 17 वर्षांनी पाकिस्तान दौ-यावर जाणार, T20 मालिकेच्या शेड्यूलची घोषणा

पुढारी ऑनलाईन डेस्क : आयसीसी टी 20 विश्वचषक 2022 स्पर्धेपूर्वी इंग्लंड संघ टी 20 मालिका खेळण्यासाठी पाकिस्तानच्या दौ-यावर जाणार आहे. तब्बल 17 वर्षांनंतर इंग्लंडचा संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळण्यासाठी पाकिस्तानात जाणार असून या दौ-यात ते तब्बल सात सामने खेळणार आहेत. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने सप्टेंबर-ऑक्टोबर 2022 मध्ये होणाऱ्या T20I मालिकेचे पूर्ण वेळापत्रक जाहीर केले आहे. (England Tour of Pakistan t20 series)

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) आज (2 ऑगस्ट) या दीर्घ टी-20 मालिकेचे वेळापत्रक जाहीर केले. इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यातील टी T20 मालिकेला 20 सप्टेंबरपासून कराची येथे सुरुवात होणार आहे. याठिकाणी मालिकेतील चार सामने खेळवले जाणार असून उर्वरीत तीन सामने लाहोर येथे होणार आहेत. ऑस्ट्रेलियात ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या T20 विश्वचषकापूर्वी दोन्ही संघांच्या तयारीसाठी ही मालिका महत्त्वाची ठरणार आहे. (England Tour of Pakistan t20 series)

पीसीबीचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट संचालक झाकीर खान म्हणाले, “आम्हाला पुष्टी करताना अत्यंत आनंद होत आहे की पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड यांच्यातील टी 20 मालिकेतील सात सामन्यांचे कराची आणि लाहोरमध्ये आयोजन करण्यात येत आहे. ज्यामुळे देशांतर्गत आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या व्यस्त, मनोरंजक आणि रोमांचक हंगामाचा पडदा उघडला जाईल. इंग्लंड हा टी 20 मध्ये अव्वल क्रमांकावर असलेल्या संघांपैकी एक आहे. पाकिस्तानमध्ये होणाऱ्या टी 20 मालिकेमुळे यजमान संघासह पाहुण्या संघाला अगामी काळात खेळवल्या जाणा-या आयसीसी टी 20 विश्वचषकाच्या तयारीला अंतिम रूप देण्यास मदत होईल. (England Tour of Pakistan t20 series)

सामन्यांचे नियोजन असे आहे…

पहिला T20 सामना : 20 सप्टेंबर, कराची
दुसरा T20 सामना : 22 सप्टेंबर, कराची
तिसरा T20 सामना : 23 सप्टेंबर, कराची
चौथा T20 सामना : 25 सप्टेंबर, कराची
पाचवा T20 सामना : 28 सप्टेंबर, लाहोर
सहावा T20 सामना : 30 सप्टेंबर, लाहोर
सातवा T20 सामना : 2 ऑक्टोबर, लाहोर

Back to top button