WTC Points Table : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप क्रमवारीत श्रीलंकेची तिसऱ्या स्थानी झेप! | पुढारी

WTC Points Table : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप क्रमवारीत श्रीलंकेची तिसऱ्या स्थानी झेप!

पुढारी ऑनलाईन डेस्क : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत श्रीलंकेने विजय मिळवताच आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) गुणतालिकेवर मोठा परिणाम झाला आहे. पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील खेळणा-या कांगारू संघाने प्रथम क्रमांक गमावले असून श्रीलंक़ा संघाने तिस-या स्थानी पोहचला आहे. (WTC Points Table australia lost first place sri lanka at number three)

श्रीलंकेच्या संघाने सोमवारी (11 जुलै) सामन्याच्या चौथ्या दिवशी गॅले स्टेडियमवर इतिहास रचला. सहा वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर श्रीलंकेने कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. त्यांनी पहिल्यांदाच कसोटीत कांगांरूंना डावाच्या फरकाने मात दिली. दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात लंकन संघाने कांगारू संघाला एक डाव आणि 39 धावांनी पराभवाची दूळ चारली. या विजयाचा त्यांना फायदा झाला असून हा श्रीलंकेचा संघ आता जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव 151 धावांत आटोपला. या विजयासह दिमुथ करुणारत्नेच्या नेतृत्वाखालील खेळणा-या श्रीलंका संघाने मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. (WTC Points Table australia lost first place sri lanka at number three)

या पराभवामुळे ऑस्ट्रेलियन संघाला पहिले स्थान गमवावे लागले. हा संघ आता 70 टक्के गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर घसरला आहे. दक्षिण आफ्रिकेने 71.43 टक्के गुणांसह अव्वल स्थान पटकावले आहे. श्रीलंकेच्या विजयानंतर 54.17 टक्के गुण झाले आहेत. कांगारू संघावर दणदणीत विजय मिळवून त्यांनी तिसरे स्थान पटकावले आहे. (WTC Points Table australia lost first place sri lanka at number three)

श्रीलंकेच्या विजयाचा फटका भारत आणि पाकिस्तानला बसला आहे. उभय संघांच्या स्थानात एक-एकने नुकसान झाले आहे. पाकिस्तान 52.38 टक्के गुणांसह चौथ्या स्थानावर तर भारत 52.08 टक्के गुणांसह पचव्या स्थानावर पोहचला आहे. श्रीलंकेच्या या ऐतिहासिक विजयामुळे भारताच्या अडचणी वाढल्या आहेत. (WTC Points Table australia lost first place sri lanka at number three)

भारताला सर्व सहा सामने जिंकावे लागतील

अंतिम फेरी गाठण्यासाठी भारताला आपले उर्वरित सहा सामने जिंकावे लागतील. टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध घरच्या भूमीवर चार कसोटी सामने खेळायचे आहेत. याशिवाय दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी संघ बांगलादेशला जाणार आहे. सहा सामन्यांतील विजयाबरोबरच क्रमवारीत वरच्या स्थानावर असलेल्या संघांचा पराभव होणेही तितकेच महत्त्वाचे आहे.

चॅम्पियन न्यूझीलंड आठव्या स्थानावर

भारतानंतर वेस्ट इंडिज सहाव्या (50 टक्के गुण), इंग्लंड सातव्या (33.33 टक्के गुण), न्यूझीलंड आठव्या (25.93 टक्के गुण) आणि बांगलादेश नवव्या स्थानावर (13.33 टक्के गुण) आहे.

Back to top button