

पुढारी ऑनलाईन डेस्क : रोहित शर्मा (Rohit Sharma Record As Captain) त्याच्या स्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जातो. जेव्हा तो फॉर्मात असतो, तेव्हा तो कोणत्याही गोलंदाजाची धुलाईसा करतो. सध्या रोहित तिन्ही फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचा कर्णधार आहे. इंग्लंडविरुद्धच्या टी २० सामन्यात त्याने एक विश्वविक्रम केला आहे. हा विक्रम यापूर्वी कोणत्याही जगातल्या कर्णधाराला करता आलेला नाही.
एजबॅस्टन कसोटीत भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता. रोहितच्या (Rohit Sharma Record As Captain) नेतृत्वाखाली पहिल्या आणि दुसऱ्या टी 20 सामन्यात भारतीय संघाने कमालीच प्रदर्शन केले आहे. इंग्लंडविरुद्धच्या दोन टी २० जिंकून रोहितने हे वर्ल्ड रेकॉर्ड बनवले. भारताने इंग्लंडविरुद्धचा दुसरा टी २० सामना ४९ धावांनी जिंकला. हा सामना जिंकून रोहित शर्माने त्याच्या नेतृत्वाखाली सलग १४ वा विजय मिळवला. अशी कामगिरी करणारा रोहित हा जगातील पहिला कर्णधार ठरला आहे. हा पराक्रम खुद्द विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनीला देखील जमलेला नाही.
अफगाणिस्तानच्या असगर अफगाण आणि रोमानियाच्या रमेश सतीसनच्या नावावर याआधी हे रेकॉर्ड होते. त्या दोघांनी टी २० मध्ये सलग १२ सामने जिंकले होते. रोहितच्या (Rohit Sharma Record As Captain) नेतृत्वाखाली भारतीय संघाने सलग १४ टी २० सामने जिंकले आहेत. रोहितने इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या टी २० मध्ये १४ चेंडूत २४ धावा फटकावल्या. तर दुसऱ्या सामन्यात त्याने २० चेंडूत ३१ धावा केल्या. कर्णधार म्हणून परदेशातील रोहित शर्माची ही पहिली सीरीज आहे. मागच्यावर्षी टी २० वर्ल्ड कप नंतर विराट कोहलीने संघाचे कर्णधारपद सोडले होते. त्यानंतर भारतीय क्रिकेट बोर्डाने तिन्ही फॉर्मेटसाठी रोहित शर्माची कर्णधारपदी निवड केली होती.
सर्वात जलद १००० धावा करणारा भारतीय कर्णधार (Rohit Sharma Record As Captain)
इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी 20 सामन्यात पुनरागमन करताना कर्णधार रोहित शर्माने १६ चेंडूत २४ धावांची खेळी केली. या खेळीच्या मदतीने रोहित टी २० क्रिकेटमध्ये सर्वात जलद १००० धावा करणारा भारतीय कर्णधार बनला आहे. हा आकडा गाठणारा भारताचा तिसरा खेळाडू ठरला आहे. कर्णधार म्हणून रोहितने विराट आणि धोनीला मागे टाकत सर्वात कमी डावात हा आकडा गाठला आहे.
कर्णधार म्हणून पाचवी सीरीज
भारतीय कर्णधार म्हणून रोहित शर्माची ही पाचवी सीरीज आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली भारताने न्यूझीलंड, वेस्ट इंडिज आणि श्रीलंके विरुद्धच्या टी २० मालिकेत निर्भेळ विजय मिळवला आहे. परदेशातील ही पहिलीच मालिका आहे. वनडे मध्ये वेस्ट इंडिज आणि कसोटीत श्रीलंकेवर विजय मिळवला होता.
रोहितची टी20 कारकीर्द
रोहित शर्मा हा टीम इंडियाचा टी २० क्रिकेटमधील सर्वात यशस्वी फलंदाजांपैकी एक आहे. त्याने टीम इंडियासाठी आतापर्यंत १२५ टी २० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याच्या नावावर ३३१३ धावा आहेत. रोहित शर्मानेही टी २० क्रिकेटमध्ये ४ शतके आणि २६ अर्धशतके झळकावली आहेत. टी २० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 4 शतके झळकावणारा तो एकमेव फलंदाज आहे.