ICC Test Ranking : विराट कोहलीला सर्वात मोठा धक्का! 2053 दिवसांनी ‘अशी’ घडली घटना…

ICC Test Ranking : विराट कोहलीला सर्वात मोठा धक्का! 2053 दिवसांनी ‘अशी’ घडली घटना…
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : विराट कोहलीला अडीच वर्षांहून अधिक काळ शतक झळकावता आलेले नाही आणि आता या अनुभवी फलंदाजाला आणखी एक धक्का बसला आहे. कसोटी क्रमवारीत विराट अव्वल दहामधून बाहेर पडला आहे. बुधवारी जाहीर झालेल्या नव्या कसोटी क्रमवारीत तो १३ व्या स्थानी घसरला आहे. एजबॅस्टन कसोटीपूर्वी विराट कोहली १० व्या क्रमांकावर होता पण खराब कामगिरीमुळे त्याची ३ स्थानांनी घसरण झाली आहे. एजबॅस्टन कसोटीच्या दोन्ही डावात शतके झळकावणारा जॉनी बेअरस्टो १० व्या स्थानी पोहचला आहे. विराट कोहली गेल्या ६ वर्षांपासून टॉप १० मध्ये होता पण त्याला २०५३ दिवसांनंतर यातून बाहेर पडावे लागले. (ICC Test Ranking virat kohli)

भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीसाठी गेली ३ वर्षे खूप वाईट गेली. यादरम्यान त्याला एकही शतक ठोकता आले नाही. इंग्लंडविरुद्धच्या ५ व्या कसोटीत किंग कोहलीची बॅट गर्जना करेल, अशी अपेक्षा होती, पण तसे झाले नाही. (ICC Test Ranking virat kohli)

विराट कोहलीचा खराब फॉर्म जबाबदार

विराट कोहली टॉप १० मधून बाहेर असण्याचे कारण म्हणजे त्याची सततची खराब कामगिरी. गेल्या दोन वर्षांपासून त्याने कसोटी क्रिकेटमध्ये अत्यंत निराशाजनक कामगिरी करत आहे. विराटने गेल्या दोन वर्षांत १६ कसोटी सामने खेळले असून यादरम्यान त्याच्या बॅटने २९.७८ च्या सरासरीने केवळ ८३४ धावा केल्या आहेत. यादरम्यान विराटच्या बॅटमधून एकही शतक झळकले नाही. विराटला केवळ ६ अर्धशतके झळकावता आली असून तो ४ वेळा ० धावांवर बाद झाला आहे. (ICC Test Ranking virat kohli)

ऋषभ पंतची कसोटी क्रमवारीत उडी

इंग्लंडचा फलंदाज जो रूट पहिल्या क्रमांकावर कायम आहे. ९०० पेक्षा जास्त रेटिंग पॉइंट्स असलेला जो रूट हा एकमेव फलंदाज आहे. दुसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा मार्नस लॅबुशेन आहे ज्याचे ८७९ पॉइंट्स आहेत. स्टीव्ह स्मिथ तिसऱ्या तर बाबर आझम चौथ्या क्रमांकावर आहे. ऋषभ पंत कसोटी क्रमवारीत पाचव्या क्रमांकावर पोहोचला आहे. पंत भारताचा कसोटी क्रमवारीत अव्वल फलंदाज बनला आहे, रोहित शर्मा ९ व्या क्रमांकावर आहे. (ICC Test Ranking virat kohli)

इंग्लंडचा फलंदाज जॉनी बेअरस्टो यालाही कसोटी क्रिकेटमधील अप्रतिम कामगिरीमुळे अव्वल १० मध्ये स्थान मिळाले आहे. बेअरस्टो १० व्या क्रमांकावर पोहोचला आहे. बेअरस्टोने मागील पाच कसोटी डावांपैकी चार डावात शतक झळकावले आहे. त्याची सरासरी १९० च्या वर आहे. (ICC Test Ranking virat kohli)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news