Edgbaston Test : इंग्लंडविरुद्धच्या पराभवावर राहुल द्रविड म्‍हणाले, “मला कोणतेही…” | पुढारी

Edgbaston Test : इंग्लंडविरुद्धच्या पराभवावर राहुल द्रविड म्‍हणाले, "मला कोणतेही..."

पुढारी ऑनलाईन डेस्‍क :
भारतीय क्रिकेट संघाला इंग्लंडविरुद्धच्या पाचव्‍या सामन्‍यात पराभवाला सामोरे जावे लागले. विशेष म्‍हणजे, एजबेस्‍टन कसोटी
( Edgbaston Test ) सामन्‍यात पहिले तीन दिवस भारतीय संघाची कामगिरी सरस होती. मात्र दुसर्‍या डावात फलंदाजांनी हाराकिरी केली आणि भारताने दिलेल्‍या आव्‍हान सात गडी राखत इंग्‍लंडने पूर्ण केले. हा भारतीय संघाच्‍या मोठ्या पराभवांपैकी एक ठरला आहे. याबाबत भारतीय क्रिकेट संघाचे मुख्‍य प्रशिक्षक राहुल द्रविड म्‍हणाला की, आमच्‍याकडे कसोटी सामना जिंकण्‍याची संधी होती. मात्र दुसर्‍या डावात फलंदाजांसह गोलंदाजांचीही कामगिरी प्रभावी झाली नाही. पराभवानंतर मला कोणतेही कारण द्‍यायचे नाही, असेही त्‍यांनी सांगितले.

Edgbaston Test : कसोटी क्रिकेट खूपच कठीण असते

इंग्‍लंड विरुद्‍धच्‍या पाचव्‍या कसोटीतील पहिल्‍या डाव्‍यात आमची कामगिरी अत्‍यंत उत्‍कृष्‍ट झाली होती. नुकतेच इंग्‍लंडने
न्‍यूझीलंडविरुद्‍धचा मालिका 3-0 अशी जिंकली होती. मात्र पाचव्‍या कसोटीतील दुसर्‍या डावात आमच्‍या दोन्‍ही बाजू ढासळल्‍या. मागील अनेक दिवसांमध्‍ये आम्‍ही कसोटी क्रिकेट खेळलेलो नाही. इंग्‍लंडविरुद्‍चा कसोटी सामना खूप दिवसांनी झाला. इंग्‍लंडच्‍या संघाने चांगली कामगिरी केली. आम्‍ही पहिल्‍या तीन दिवसांमध्‍ये केलेली कामगिरी कायम ठेवू शकलो नाही. कसोटी क्रिकेट खूपच कठीण असते. तुम्‍हाला पाच दिवस कामगिरीचा दर्जा कायम ठेवावा लागतो, असेही त्‍यांनी नमूद केले.

दक्षिण आफ्रिकेनंतर इंग्‍लडविरुद्‍धचा सामना जिंकण्‍याची संधी आमच्‍याकडे होती. मात्र आम्‍ही या संधीचे सोने केले नाही. मागील काही वर्ष आम्‍ही चांगले क्रिकट खेळलो आहे, असेही ते म्‍हणाले.

काय आहे ‘बेजबॉल’?

या पत्रकार परिषदेत राहुल द्रविड यांना ‘बेजबॉल’बाबत प्रश्‍न विचारण्‍यात आला. यावर त्‍यांनी आपल्‍याला याबाबत काही माहित नसल्‍याचे सांगितले. इंग्‍लंडचा क्रिकेट संघ केली १८ महिने कसोटी क्रिकेटमध्‍ये सातत्‍याने पराभूत होत होता. ॲशेस मालिकेतील पराभवानंतर भारताकडून दोन सामने हा संघ पराभूत झाला. वेस्‍ट इंडिज संघानेही इंग्‍लंडचा पराभव केला. यानंतर न्यूझीलंडचा माजी कर्णधार ब्रेंडन मॅककलम याची इंग्लंड कसोटी संघाच्या प्रशिक्षकपदी नेमणूक करण्यात आली. बेजबॉल हा ब्रेंडन मॅककलम याच्‍या टोपण नावातून आलेला शब्‍द आहे. कारण ब्रेंडन इंग्‍लंडच्‍या कसोटी संघाचा प्रशिक्षक झाल्‍यापासून या संघाने सलग चार सामने जिंकले आहेत. त्‍याच्‍या विचाराने संघात सकारात्‍मक बदल झाला आहे. त्‍यामुळे विजयाचा विचार आणि खेळाडूंची सकारात्‍मक मानसिकतेसाठी हा शब्‍द वापरला जात आहे.

हेही वाचा : 

Back to top button