मोठी बातमी! शिखर धवनची टीम इंडियाच्या कर्णधारपदी नियुक्ती | पुढारी

मोठी बातमी! शिखर धवनची टीम इंडियाच्या कर्णधारपदी नियुक्ती

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) वेस्ट इंडिज दौऱ्यावर होणाऱ्या एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. शिखर धवनला वनडे मालिकेसाठी कर्णधार बनवण्यात आले आहे. त्याचबरोबर वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे.

निवड समितीने वेस्ट इंडिजविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघाची आज घोषणा केली. रोहित शर्मा, विराट कोहली, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या आणि जसप्रीत बुमराह या बड्या खेळाडूंना १७ सदस्यीय स्थान न देता त्यांना विश्रांती देण्यात आली आहे. अशाप्रकारे सात महिन्यांत भारताला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सातवा कर्णधार मिळणार आहे.

वनडे संघात अनेकांचे पुनरागमन झाले आहे. ज्यात संजू सॅमसन, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज या नावांचा समावेश आहे. या मालिकेत इशान किशन, शुभमन गिल यांनाही संधी देण्यात आली आहे.

विराट कोहलीने वर्ष 2022 ची सुरुवात कसोटी मालिकेने कर्णधार म्हणून केली होती, परंतु त्याने जानेवारीतच कर्णधारपद सोडले होते. यानंतर रोहित शर्मा जखमी झाल्याने केएल राहुल वनडे संघाचा कर्णधार झाला. तथापि, रोहित शर्माने पुढे अनेक मालिकांमध्ये संघाचे नेतृत्व केले. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेत ऋषभ पंत कर्णधार झाला, तर हार्दिक पांड्याने आयर्लंडविरुद्ध कर्णधारपद भूषवले. जसप्रीत बुमराहने इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत टीम इंडियाचे नेतृत्व केले. तर शिखर धवन आता वेस्ट इंडिज विरुद्धच्या वनडे मालिकेत संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळणार आहे. टीम इंडियाचा इंग्लंड दौरा 17 जुलैला संपत आहे, तर वेस्ट इंडिजचा दौरा 22 जुलैपासून सुरू होणार आहे.

जानेवारी 2022 ते जुलै 2022 पर्यंत भारताचे कर्णधार

जानेवारी : विराट कोहली
जानेवारी : केएल राहुल
फेब्रुवारी-मार्च : रोहित शर्मा
जून : ऋषभ पंत
जून : हार्दिक पंड्या
जुलै : जसप्रीत बुमराह
जुलै : शिखर धवन

असा आहे भारताचा वेस्ट इंडिज दौरा…

पहिला एकदिवसीय – 22 जुलै संध्याकाळी 7 वाजता
दुसरी वनडे – 24 जुलै संध्याकाळी 7 वाजता
तिसरी एकदिवसीय – 27 जुलै, संध्याकाळी 7 वाजता

पहिला T20 सामना – 29 जुलै
दुसरा T20 सामना – 1 ऑगस्ट
तिसरा T20 सामना – 2 ऑगस्ट
चौथी T20 सामना – 6 ऑगस्ट
पाचवा T20 सामना – 7 ऑगस्ट

सध्या फक्त एकदिवसीय मालिकेसाठी संघाची घोषणा करण्यात आली आहे, तर टी-20 मालिकेच्या संघाची घोषणा नंतर होईल. पाच सामन्यांच्या T20 मालिकेसाठी वरिष्ठ खेळाडूंचे पुनरागमन होण्याची शक्यता आहे. कारण टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या तयारीसाठी ही अत्यंत महत्त्वाची मालिका आहे.

भारतीय संघ खालील प्रमाणे-

शिखर धवन (कर्णधार), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुबमन गिल, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ईशान किशन (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शार्दुल ठाकूर, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, आवेश खान, प्रणंद कृष्णा, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिंग.

Back to top button