Joe Root ची कसोटी क्रिकेटमध्ये धमाकेदार कामगिरी, सुनील गावस्करचा रेकॉर्ड मोडला!

Joe Root ची कसोटी क्रिकेटमध्ये धमाकेदार कामगिरी, सुनील गावस्करचा रेकॉर्ड मोडला!
Published on
Updated on

नॉटिंगहॅम (इंग्लंड) : इंग्लंडचा माजी कर्णधार जो रुट (Joe Root) याने कसोटी क्रिकेटमध्ये धमाकेदार कामगिरी कायम ठेवली आहे. आता जो रुट कसोटी क्रिकेटमध्ये १३ वा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. इंग्लंडचा फलंदाज जो रूटने कसोटी क्रिकेटमध्ये १०,१९१ धावा पूर्ण केल्या आहेत. यामुळे त्याने भारताचे माजी महान फलंदाज सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांचा १०,१२२ धावांचा विक्रम मोडला आहे. रुटने न्यूझीलंड विरुद्ध (ENGvNZ) सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी ट्रेंट ब्रिज येथे ही कामगिरी केली. इंग्लंडच्या पहिल्या डावात रुटने एकूण १७६ धावांची खेळी केली. या विक्रमासह रुटने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज गावस्कर आणि पाकिस्तानच्या युनिस खान यांना मागे टाकले आहे. युनिस खान या यादीत १५ व्या स्थानी आहे.

तसेच इंग्लंडने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या यादीत १२व्या स्थानावर झेप घेतली आहे. या यादीत भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर १५,९२१ धावांसह अव्वल स्थानी आहे. या यादीत ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉटिंग दुसऱ्या स्थानी आहे. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये १३,३७८ धावा केल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेचा माजी अष्टपैलू खेळाडू १३,२८९ धावांसह तिसऱ्या स्थानी आहे.
दुसऱ्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात ५५४ धावांचे लक्ष्य ठेवले होते. डॅरिल मिशेल याने १९० आणि टॉम ब्लंडेल याने १०६ धावा केल्या. इंग्लंडकडून जेम्स अँडरसनने ३ तर स्टुअर्ट ब्रॉड, बेन स्टोक्स आणि जॅक लीचने प्रत्येकी दोन बळी घेतले.

दरम्यान, न्यूझीलंडच्या ट्रेंट बोल्टने ५ आणि मायकेल ब्रेसवेलने ३ विकेट घेत इंग्लंडला ५३९ धावांवर रोखले. त्यानंतर फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या न्यूझीलंडने चौथ्या दिवसाच्या अखेरीस ७ बाद २२४ धावा केल्या. डॅरिल मिशेल आणि मॅट हेनरी नाबाद आहेत.
जो रुटच्या (Joe Root) पुढे स्टीव्ह वॉ आहे. त्याच्या नावावर १०,९२७ धावा आहेत. जो रुटची नजर एलेन बॉर्डर याच्यावरदेखील आहे; ज्याच्या नावावर ११,१७४ धावा आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news