ICC World Test Championship: भारताला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायलनमधून बाहेर पडण्याचा धोका | पुढारी

ICC World Test Championship: भारताला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायलनमधून बाहेर पडण्याचा धोका

पुढारी ऑनलाईन डेस्क : इंग्लंडने पाचव्या कसोटी (England vs India, 5th Test) सामन्यात भारताचा पराभव करुन वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप (ICC World Test Championship) मधील गुणतालिकेत आपली स्थितीमध्ये सुधारणा केली आहे. भारता विरुद्धच्या विजयानंतर इंग्लंडसंघाचे आता ६४ पॉईंट झाले आहेत. या पॉईंटच्या आधारे ते गुणतालिकेत ७ स्थानी आले आहेत. दुसरीकडे पराभवामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये पोहचण्याच्या स्वप्नाला धक्का बसला आहे. पराभवानंतर भारत गुणतालिकेत ३ स्थानावर अद्याप अबाधित आहे. पण, फायनलमध्ये पोहचण्यासाठी उर्ववरीत सर्व कसोटी सामने भारताला जिंकणे आवश्यक झाले आहे. आता भारत बांगलादेश सोबत २ आणि ऑस्ट्रेलिया सोबत ४ कसोटी सामने खेळणार आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या गुणतालिकेत (World Test Championship Points Table) प्रथम क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा संघ आहे. ७७.७८ अंकासह एकूण ८४ पॉईंटच्या कमाईने या गुणतालिकेत अग्रस्थानी आहेत. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिकेचा संघ आहे. त्यांच्याकडे ७१.४३ अंक आणि ६० पॉईंट आहेत. तिसऱ्या स्थानी भारत आहे. भारतातकडे ७७ पॉईंटसह ५३.७७ अंक आहेत. भारताने १२ कसोटी पैकी सहा सामन्यात विजय नोंदवला आहे तर २ सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. तसेच दोन सामने अनिर्णित राहिले आहेत. पाकिस्तानचा संघ भारताचा मागे म्हणजे चौथ्या स्थानावर आहे. पण, त्यांना भारताच्या पुढे जाण्याची संधी आहे. पाकिस्तानचे ५२.३८ अंक आहेत तर त्यांच्याकडे ४८ पॉईंट आहेत. पाकिस्तान अद्याप श्रीलंकेसोबत दोन कसोटी सामने खेळणार आहे. (ICC World Test Championship)

मागील वर्षी भारत इंग्लंडदौऱ्यावर गेला होता तेव्हा इंग्लंड विरुद्धच्या पाच कसोटी सामन्याच्या मालिकेत ४ सामन्यामध्ये २ – १ आघाडी घेतली होती. शेवटचा ५ वा सामना कोविडमुळे रद्द करण्यात आला होता. तो उर्वरित सामना १ जुलै ते ५ जुलै दरम्यान खेळविण्यात आला. या सामन्यात इंग्लंडने भारताला पराभूत करुन मालिका २-२ ने बरोबरीत सोडवली. जॉनी बियअस्टो आणि जो रुट यांनी भारताच्या प्रभावी गोलंदाजील निष्प्रभ करुन पाचव्या दिवशी सामन्यात विजय नोंदविला. मोठ्या लक्षाचा पाठलाग करताना इंग्लंडने सात विकेट राखत इंग्लंडने भारतला पराभूत केले. इंग्लंडने या आधी न्युझीलंड विरुद्धची कसोटी मालिका ३-० अशी जिंकली होती. (ICC World Test Championship)

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप मधील फायनल मध्ये पोहचण्यासाठी भारताला मोठी कसरत करावी लागणार आहे. उर्वरीत सर्व अर्थात बांगलादेश विरुद्धचे दोन आणि ऑस्ट्रलिया विरुद्धचे चार सामने जिंकावेच लागणार आहेत. पहिल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये भारताला न्यूझीलंडकडून पराभव स्विकारावा लागला होता.

Back to top button