Virat Kohli : विराट कोहलीच्या ‘जोश’ पुढे सर्वच फिके! (Video) | पुढारी

Virat Kohli : विराट कोहलीच्या ‘जोश’ पुढे सर्वच फिके! (Video)

पुढारी ऑनलाईन डेस्क : एजबॅस्टन येथे भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवी कसोटी रोमांचक टप्प्यात पोहचली आहे. या सामन्यात कोहलीची बॅट काही तळपली नाही, पण क्षेत्ररक्षण करताना त्याचा ‘जोशीला’ अंदाज पहायला मिळत आहे. सोमवारी (४ जुलै) सामन्याच्या चौथ्या दिवशी इंग्लंडचा फलंदाज बाद झाल्यानंतर विराटने अशा प्रकारे आनंद साजरा केला की, त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. (virat kohli video)

विराट कोहली

भारताने पहिल्या डावात 416 धावा केल्यानंतर इंग्लंडचा संघ पहिल्या डावात 284 धावांत आटोपला. यानंतर टीम इंडियाने दुसऱ्या डावात 245 धावा करून यजमान इंग्लंडसमोर विजयासाठी 378 धावांचे लक्ष्य ठेवले. इंग्लंडच्या अॅलेक्स लीस आणि जॅक क्रॉलीने दुसऱ्या डावात संघाला दमदार सुरुवात करून दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 107 धावांची भागीदारी केली. (virat kohli video)

विराट कोहली

भारताला 22 व्या षटकात पहिला ब्रेकथ्रू मिळाला. जसप्रीत बुमराहने जॅक क्रॉलीला (46 धावा) क्लीन बोल्ड केले. यानंतर त्याने 24 व्या षटकात ऑली पोपला (0) यष्टिरक्षक ऋषभ पंतकडे झेलबाद केले. अॅलेक्स लीस 25व्या षटकात धावबाद झाला. यानंतर विराट कोहलीने असा काही आनंद साजरा केला की, सर्वच बघत राहिले. प्रेक्षक तर रोमांचित झाले. भारतीय खेळाडू एका ठिकाणी सेलिब्रेशन करत होते आणि कोहली एकटाच सुसाट पळत आरडाओरडा करून सेलिब्रेशन गुंग होता. विराट हवेत हातवारे करत होता.

पहिल्या डावात 11 धावा करून कोहली बाद झाला. दुसऱ्या डावात त्याला केवळ 20 धावा करता आल्या. अशाप्रकारे त्याला कसोटीत केवळ 31 धावा करता आल्या. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने 75 डावांत एकही शतक झळकावलेले नाही. या मालिकेतील पाच सामन्यांमध्ये विराटने एकूण 249 धावा केल्या. त्याने पाच कसोटींच्या नऊ डावांत दोन अर्धशतके झळकावली. ही कामगिरी त्याच्या लौकिकाला साजेशी नसल्याची आहे, असे म्हणत अनेकांनी त्याच्यावर टीका केली आहे.

Back to top button