कर्णधार विराट विरोधात 'या' खेळाडूने केली आदळआपट | पुढारी

कर्णधार विराट विरोधात 'या' खेळाडूने केली आदळआपट

लंडन; पुढारी ऑनलाईन: कर्णधार विराट कोहलीच्‍या नेतृत्‍वाखालील टीम इंडियाने लॉर्ड्‍स मैदानावर तब्‍बल १५१ धावांनी इंग्‍लंडला धूळ चारली. हा विजय भारतासाठी ऐतिहासिक ठरला. या सामन्‍यात भारतीय क्रिकेटपटूंनी उत्‍कृष्‍ट प्रदर्शन केलेच त्‍याचबरोबर इंग्‍लंडच्‍या टोमण्‍यांना सडेतोड प्रत्‍यूत्तरही दिले. या सामन्‍यात कर्णधार विराट कोहलीने दाखवलेला आक्रमक वर्तनाची चर्चा सर्वत्र रंगली आहे. इंग्‍लंडचा माजी क्रिकेटपटू निक कॉम्‍पटन यांनी कर्णधार विराट च्‍या मैदानावरील वर्तनावर टीका केली आहे.

कर्णधार विराटसह भारतीय खेळाडूंनी दाखवलेल्‍या आक्रमक बाणा इंग्‍लंडचा माजी क्रिकेटपटू निक कॉम्‍पटन याला झोंबला आहे. त्‍याने म्‍हटलं आहे की, कर्णधार विराट कोहली याने सामन्‍यावेळी अपशब्‍द वापरले. कोहली हा सामन्‍यात सर्वाधिक अपशब्‍द बोलणारा खेळाडू हाेता. २०१२मध्‍ये माझ्‍याबद्‍दल काढण्‍यात आलेले अपशब्‍द अजूनही माझ्‍या स्‍मरणात आहेत.

माझ्‍या आजोबांनी १९३७ ते १९५७ या कालावधीमध्‍ये ७८ कसोटी सामने खेळले. या काळात क्रिकेट हा सभ्‍य माणसांचा खेळ होता.

क्रिकेटमध्‍ये स्‍लेजिंगची सुरुवात ऑस्‍ट्रेलियाच्‍या खेळाडूनही ७०च्‍या दशकात केली. यानंतर तो प्रकार सुरु झाला, असेही त्‍याने म्‍हटले आहे.

लॉर्डस् कसोटी सामन्‍यावेळी विरोट कोहली आणि इंग्‍लंडचा वेगवान गोलंदाज जेम्‍स अंडरसन यांच्‍या बाचाबाची झाली होती. मात्र यानंतर कोहलीने स्‍वत:हून अंडरसन यांच्‍याशी हस्‍तांदोलन केले.

यानंतर भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने सामन्‍यावेळी इंग्‍लंडच्‍या खेळाडूंना सडेतोड प्रत्‍युत्तर दिले होते.

निक कॉम्‍पटन याने २०१२ ते २०१६ या कालावधीत इंग्‍लंडसाठी १६ कसोटी सामने खेळले. त्‍याने एकूण ७७५ धावा केल्‍या आहेत.

हेही वाचलं का? 

पाहा व्‍हिडीओ : वाद्य बनविणारे मोहम्मद मुस्तफा…| Musical Instruments are made in Pune

 

Back to top button