Dinesh Karthik : आरसीबीच्या दिनेश कार्तिकविरुद्ध मोठी कारवाई, IPL ने ठरवले दोषी | पुढारी

Dinesh Karthik : आरसीबीच्या दिनेश कार्तिकविरुद्ध मोठी कारवाई, IPL ने ठरवले दोषी

पुढारी ऑनलाईन डेस्क : Dinesh Karthik : इंडियन प्रीमियर लीगमध्ये आज (27 मे) रॉयल चॅलेंजर्स बंगळूर (RCB) त्यांचा दुसरा क्वालिफायर सामना खेळायचा आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 पासून हा सामना राजस्थान रॉयल्स (RR) विरुद्ध खेळला जाईल. हा सामना जिंकणाऱ्या संघाची अंतिम फेरीत गुजरात टायटन्सशी (GT) गाठ पडेल.

या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी आरसीबी संघाला मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकवर (Dinesh Karthik) मोठी कारवाई झाली असून आयपीएलने कार्तिकला आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी ठरवले आहे. यामुळे आयपीएलने कार्तिकला फटकारले आहे. मात्र, याचे कोणतेही कारण सांगण्यात आले नाही. 25 मे रोजी झालेल्या एलिमिनेटर सामन्यात कार्तिक दोषी आढळला असून त्याने आपली चूकही मान्य केली आहे.

कार्तिकने (Dinesh Karthik) आयपीएल आचारसंहितेच्या कलम 2.3 अंतर्गत लेव्हल 1 गुन्ह्यासाठी दोषी असल्याचे मान्य केले असून त्याने शिक्षा स्वीकारली. आचारसंहितेच्या लेव्हल 1 भंगासाठी मॅच रेफरीचा निर्णय अंतिम आणि बंधनकारक आहे. मात्र, त्याने नेमका कोणता गुन्हा केला याची माहिती देण्यात आलेली नाही.

लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध खेळल्या गेलेल्या एलिमिनेटर सामन्यात कार्तिकने 23 चेंडूत नाबाद 37 धावा केल्या आणि आरसीबीचा डाव चांगला संपवला. यादरम्यान त्याने रजत पाटीदारसोबत 92 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. पाटीदारही 112 धावांवर नाबाद राहिला. या दोघांच्या शानदार खेळीच्या जोरावर आरसीबीने 208 धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात लखनौचा संघ केवळ 193 धावा करू शकला आणि त्यांना 14 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले.

कार्तिकने (Dinesh Karthik) या हंगामात आतापर्यंत 15 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 64.80 च्या सरासरीने 324 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने अर्धशतकही फटकावले आहे. कार्तिक आपल्या संघासाठी सर्वोत्तम फिनिशरची भूमिका बजावत आहे. दिनेशने या मोसमात आतापर्यंत 22 षटकार आणि 27 चौकार मारले आहेत.

Back to top button