IND vs IRELAND : एका वर्षात टीम इंडियाला मिळाले पाच कर्णधार! | पुढारी

IND vs IRELAND : एका वर्षात टीम इंडियाला मिळाले पाच कर्णधार!

पुढारी ऑनलाईन डेस्क : सध्या भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका ही टी-20 मालिका सुरू आहे. दक्षिण आफ्रिकेने या मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. या मालिकेनंतर भारतीय संघ आयर्लंडच्या दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. आयर्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघातील खेळाडूंची घोषणा देखील करण्यात आली आहे. आयर्लंडविरूद्धच्या या मालिकेसाठी निवड सिमितीने भारतीय संघाच्या कर्णधार पदाची जबाबदारी हार्दिक पंड्यावर सोपवली आहे. भारतीय संघ आयर्लंडमध्ये दोन टी-20 सामने खेळणार आहे. हार्दिक पंड्या या दोन सामन्यांमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व करेल. निवड सिमितीने हार्दिक पंड्याची कर्णधार म्हणून निवड केल्यानंतर 63 वर्षांनंतर इतिहासाची पुनरावृत्ती झाली आहे. (IND vs IRELAND)

1959 साली पाच खेळाडूंनी केले होते भारतीय संघाचे नेतृत्व (IND vs IRELAND)

जानेवारी 2022 पासून आत्तापर्यंत आत्तापर्यंत भारतीय संघाचे चार खेळाडूंनी नेतृत्व केले आहे. हार्दिक पंड्या भारतीय संघाचे नेतृत्व करणारा पाचवा खेळाडू ठरणार आहे. 1959 साली हेमू अधिकारी, दत्ता गायकवाड, वीनू मांकड, गुलाबराय रामचंद्र आणि पंकज रॉय या  पाच खेळाडूंनी भारतीय संघाचे नेतृत्व केले होते.

यावर्षी भारतीय संघाचे नेतृत्व करणारे चार खेळाडू पुढील मालिका खेळणार नाहीत.

यावर्षी रोहित शर्मा, के.एल.राहुल, विराट कोहली, ऋषभ पंत यांनी भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे. सध्या भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरूद्ध टी-20 मालिका खेळत आहे. तर आयर्लंडविरूद्धच्या मालिकेसाठी रोहित शर्मा, विराट कोहली, रिषभ पंत यांना आराम देण्यात आला आहे. तर के.एल. राहुल जखमी असल्याने आयर्लंडविरुद्धची टी-20 मालिका खेळू शकणार नाही. (IND vs IRELAND)

आयर्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघ – (IND vs IRELAND)

हार्दिक पंड्या (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, ईशान किशन, ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, व्यंकटेश अय्यर, दीपक हुड्डा, राहुल त्रिपाठी, दिनेश कार्तिक, यजुवेंद्र चहल, रवी बिश्नोई, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंग, उमरान मलिक

हेही वाचलंत का?

Back to top button