KL Rahul : जायबंदी केएल राहुल उपचारासाठी जाणार परदेशात, इंग्लंड दौ-यातून बाहेर | पुढारी

KL Rahul : जायबंदी केएल राहुल उपचारासाठी जाणार परदेशात, इंग्लंड दौ-यातून बाहेर

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) केएल राहुलला (KL Rahul) उपचारासाठी परदेशात पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. भारताचा सलामीवीर आणि उपकर्णधार राहुलवर याच्यावर जर्मनीत उपचार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे केएल राहुल इंग्लंड दौऱ्यावर जाणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. राहुल सध्या पायाच्या दुखापतीने त्रस्त आहे आणि त्यातून सावरण्यासाठी तो इंग्लंड दौ-यातून बाहेर पडला आहे. या दौ-यात भारताला एकूण सात सामने खेळायचे आहेत.

भारतीय कसोटी संघ लंडनला पोहोचला आहे. विराट कोहली, जसप्रीत बुमराह, ऑफस्पिनर आर. अश्विन, अष्टपैलू रवींद्र जडेजा, वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर आणि प्रसिद्ध कृष्णा, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी आणि यष्टिरक्षक केएस भरत यांचाही समावेश आहे. (KL Rahul)

भारताचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडसह उर्वरित संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या टी-20 मालिकेनंतर लंडला रवाना होणार आहे. मागील वेळेप्रमाणे या वेळी बायो-बबल नसल्याने चार्टर फ्लाइट घेण्यात आली नव्हती. पण इंग्लंडला जाण्यापूर्वी सर्व खेळाडूंची कोविड-19 साठी चाचणी करण्यात आली. (KL Rahul)

इंग्लडमध्ये भारतीय संघाला एक टेस्ट (1 ते 5 जुलै) सह तीन टी 20 आणि तीन वनडे सामने खेळायचे आहेत. या दौ-यात टीम इंडियाचे नेतृत्व रोहित शर्माकडे असेल. उप-कर्णधार केएल राहुलकडे देण्यात आले होते पण तो जखमी असल्याने आता त्याच्या जागी नव्या उपकर्णधाराची निवड करावी लागणार आहे. (KL Rahul)

Back to top button