पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) 15 जून रोजी आयर्लंडविरुद्ध होणाऱ्या आगामी दोन सामन्यांच्या T20 आंतरराष्ट्रीय मालिकेसाठी 17 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. भारतीय अष्टपैलू हार्दिक पंड्या टीम इंडियाचे नेतृत्व करेल, तर भुवनेश्वर कुमारची उपकर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. (rahul tewatia ignored from ireland tour)
17 सदस्यीय संघातील बहुतेक नावे परिचित अशीच आहेत. कारण निवडकर्त्यांनी संघात फक्त एका नव्या चेहऱ्याचा समावेश केला आहे. सूर्यकुमार यादव आणि संजू सॅमसन आयर्लंड दौऱ्याच्या निमित्ताने भारतीय क्रिकेट संघात पुनरागमन केले आहे. तर राहुल त्रिपाठीचा पहिल्यांदाच राष्ट्रीय संघात समावेश करण्यात आला आहे. 17 सदस्यीय टीम इंडियामध्ये उर्वरित इतर खेळाडूंची निवड होणे अपेक्षित होते. (rahul tewatia ignored from ireland tour)
राहुल तेवतियाला आयर्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघात स्थान मिळालेले नाही. द. आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या T20 मालिकेसाठी तेवतियाची निवड होईल अशी अपेक्षा होती पण निवड समितीने त्याला संधी दिली नाही. अशातच आता आयर्लंड दौ-यासाठीही त्याची भारतीय संघात निवड न झाल्याने तेवतियाने सोशल मीडियावरून नाराजी व्यक्त केली आहे. (rahul tewatia ignored from ireland tour)
तेवतिया आयपीएल 2022 च्या हंगामात गुजरात टायटन्सकडून (GT) खेळला. या अष्टपैलू खेळाडूने IPL 2022 मध्ये 147.62 च्या स्ट्राइक रेटने 217 धावा केल्या आणि त्याने संघाच्या यशात अनेक महत्त्वपूर्ण खेळींचे योगदान दिले. तथापि, भारताकडे सध्या हार्दिक पंड्या आणि दिनेश कार्तिक हे दोन फिनिशर आहेत, ज्यामुळे राष्ट्रीय निवडकर्त्यांना दुसरा फिनिशर निवडणे योग्य वाटले नसावे. असे असले तरी तेवतियाला संघात स्थान मिळणे आवश्यक होते, असे अनेक तज्ज्ञांचे मत आहे. आयर्लंड दौऱ्यासाठी निवड न झाल्याने राहुल तेवतियाने ट्विटरवर आपली नाराजी व्यक्त केली आणि 'अपेक्षांमुळे दुखावलो' असल्याचे म्हटले. (rahul tewatia ignored from ireland tour)
आयर्लंड आणि भारत यांच्यात दोन सामन्यांची T20 आंतरराष्ट्रीय मालिका 26 आणि 28 जून रोजी डब्लिनमधील द व्हिलेज येथे खेळवली जाईल. या मालिकेसाठी भारताचा संघ पुढील प्रमाणे आहे… हार्दिक पंड्या (कर्णधार), भुवनेश्वर कुमार (उपकर्णधार), इशान किशन, ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, व्यंकटेश अय्यर, दीपक हुड्डा, राहुल त्रिपाठी, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंग, उमरान मलिक