व्हिडिओ : नीरज चोप्रानं स्वतःचाच टोकियो ऑलिम्पिकमधील विक्रम मोडला | पुढारी

व्हिडिओ : नीरज चोप्रानं स्वतःचाच टोकियो ऑलिम्पिकमधील विक्रम मोडला

पुढारी ऑनलाईन : टोकियो ऑलिम्पिक सुवर्ण कामगिरी करणाऱ्या नीरज चोप्राने भालाफेकमध्ये स्वत:चाच टोकियो ऑलिम्पिकमधील विक्रम मोडत नवीन इतिहास रचला आहे. नीरजने पोलंडमध्ये सुरू असलेल्या जागतिक अँथलेटिक्स स्पर्धेत ८९.३० मीटर भालाफेक करत हा नवीन विक्रम रचला आहे. त्याने टोकियो ऑलिम्पिकमध्ये मिळवलेला स्वत:चाच ८७.५८ मीटरचा विक्रम मोडीत काढला आहे.

सध्या फिनलँडमध्ये सुरू असलेल्या पावो नुर्मी गेम्समध्ये नीरज चोप्रा सहभागी झाला आहे. याठिकाणी त्याने ८९.३० मीटर लांब भालाफेक करत, रौप्य पदक पटकावले आहे. जागतिक अँथलेटिक्स स्पर्धेत दैदिप्यमान कामगिरी करत  त्याने टोकियो ऑलिम्पिकमध्ये नोंदवलेला स्वत:चा राष्ट्रीय विक्रम मोडीत काढला आहे. टोकियो ऑलिम्पिकनंतर पहिल्यांदाच नीरज चोप्रा या स्पर्धेत उतरला आहे.

नीरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकलं होतं. यात त्याने पहिल्या प्रयत्नात ८७.०३ मीटर लांब भाला फेकला होता. तर दुसऱ्या प्रयत्नात ८७.५८ मीटर आणि तिसऱ्या प्रयत्नात ७६.७९ मीटर भाला फेकला होता. पावो नुर्मी गेम्स २०२२ मध्ये भालाफेकीत फिनलँडचा ओलिवर हेलँडरने पहिले स्थान पटकावले. त्याने पहिल्या प्रयत्नात ७७.६५ मीटर, तर दुसऱ्या प्रयत्नात ८९.८३ मीटर आणि तिसऱ्या प्रयत्नात ८१.६७ मीटर भालाफेक करत सुवर्ण कामगिरी केली.

पुढच्या आठवड्यात फिनलँडमध्ये होणाऱ्या कोर्टेन खेळांमध्येही नीरज  सहभागी होणार आहे. ३० जूनला स्टॉकहोम लेग ऑफ द डायमंड लीगमध्येही तो जाणार आहे. या स्पर्धांमध्ये सहभागी होण्यापूर्वी नीरजने युएसए आणि तुर्कीत प्रशिक्षण घेतलं आहे.

हेही वाचा :

 

 

Back to top button