Joe Root Magical Bat : रूट झाला ‘जादूगार’, बॅटला आधार न देता क्रीझवर राहिला उभा! (Video) | पुढारी

Joe Root Magical Bat : रूट झाला ‘जादूगार’, बॅटला आधार न देता क्रीझवर राहिला उभा! (Video)

पुढारी ऑनलाईन डेस्क : इंग्लंडचा माजी कर्णधार जो रूटने (Joe Root) न्यूझीलंडविरुद्धच्या लॉर्ड्स कसोटीत आश्चर्यकारक कामगिरी केली. त्याने चौथ्या डावात शतक झळकावून आपल्या संघाला विजय मिळवून दिला, तसेच कसोटी क्रिकेटमध्ये त्याने 10,000 धावांचा पल्ला पार केला. मात्र या सगळ्याशिवाय जो रूटचे आणखी एक आश्चर्य सध्या चर्चेचा विषय बनले असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (Joe Root Magical Bat)

चर्चेत असलेल्या व्हिडिओमध्ये जो रूट संघाच्या फलंदाजीदरम्यान नॉन स्ट्रायकरच्या टोकाला उभा आहे. त्याची बॅट कोणत्याही आधाराशिवाय खेळपट्टीवर उभी असते आणि पुढे जाताच तो बॅट पकडतो. आता चाहत्यांची नजर जो रूटच्या (Joe Root) या जादूकडे वळली आहे.

जो रुट (Joe Root) ८७ धावांवर फलंदाजी आणि न्यूझीलंडचा काईल जेमिसन गोलंदाजी करत होता तेव्हा हा प्रकार घडला. लाखो लोकांनी ट्विटरवर काही सेकंदांचा हा व्हिडिओ पाहिला असून तो अनेक वेळा शेअर करण्यात आला आहे.

चाहते कमेंट करत आहेत की, जो रूट (Joe Root) फलंदाजीत जादू करतो हे आम्हाला ठाऊक होते, पण बॅट आधाराशिवाय उभी कशी राहिली त्याची अपेक्षाही आम्हालाही नव्हती. काही चाहत्यांनी म्हटलंय की, बॅट स्वतःच उभी आहे की जो रूट खरोखर जादूगार आहे? मात्र, काही चाहत्यांनीच या गूढतेचे उत्तर दिले.

वास्तविक, रूटची जी (Joe Root) बॅट आहे त्याचा तळातील भाग पूर्णपणे फ्लॅट आहे. अनेक बॅटचा तळ हा नेहमी व्हिशेप असतो. मात्र जो रूटच्या बॅट बाबत असे नाही. त्याची बॅट वजनदार आहे. अशातच तिचा तळची फ्लॅट आहे. त्यामुळे रूटला त्याची बॅट आधाराशिवाय उभी करण्यात कसलीच अडचण आली नाही.

दरम्यान, रूट हा अ‍ॅलिस्टर कूकनंतर 10,000 धावा पूर्ण करणारा दुसरा आणि एकूण 14 वा इंग्लिश खेळाडू ठरला आहे. त्याने 218 व्या डावात 10,000 धावांचा टप्पा गाठला. त्याने 115 धावांची नाबाद खेळी खेळली.

Back to top button