पुणे : शूटिंग रेंजची दुरवस्था; खेळाडूंना मनःस्ताप | पुढारी

पुणे : शूटिंग रेंजची दुरवस्था; खेळाडूंना मनःस्ताप

सुनील जगताप

पुणे : नेमबाजीने देशाला गौरव मिळवून दिला आहे. मग ते राष्ट्रकुल खेळ असो किंवा ऑलिम्पिक… मात्र, याच खेळाच्या रायफल शूटिंग रेंजची दुरवस्था झाली आहे. महापालिका प्रशासनाच्या अनास्थेमुळे खेळाडूंना या स्टेडियमपासून दूर राहावे लागत आहे.

नवज्योत सिंग सिद्धू कैदी नंबर २४१३८३, कारागृहात करणार क्लार्कचे काम

हडपसर येथील शिंदे वस्तीतील कै. विठ्ठलराव तुपे रायफल शूटिंग रेंजची दुरवस्था झाली आहे. मध्यंतरी रात्री अज्ञातांनी कोट्यवधी रुपयांच्या उपकरणांची तोडफोड केली आहे. यानंतरही महापालिका प्रशासन जागे झालेले नाही. तेथे सुरक्षारक्षकांची नेमणूकही करण्यात आलेली नाही. या शूटिंग रेंजमध्ये 10 मीटर रेंजचे सर्वांत मोठे नुकसान झाले आहे.

देशमुख, मलिक यांच्यानंतर आता परबांचा नंबर, अनिल परब यांच्या निवासस्थानी ईडीची छापेमारी

डिस्प्ले, प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी) सीलिंग आणि लाईट फिटिंग्जची तोडफोड करण्यात आली आहे. त्याचबरोबर या स्टेडियममध्ये मोठ्या प्रमाणावर झाडा-झुडपांची वाढ झाली असून, त्याची देखभाल दुरुस्ती करण्यात प्रशासन टाळाटाळ करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. दरम्यान, याबाबत महापालिका आयुक्तांनीच लक्ष घातले असून भवन विभागाला तशा सूचना ही दिल्याचे क्रीडा विभागातील अधिकार्‍यांनी सांगितले.

‘सिंचन’ची आऊटसोर्सिंगमध्ये बनवेगिरी

10 मीटर श्रेणीची मशीन पूर्णपणे खराब झाली आहे आणि ती चालू करण्यासाठी तीन लाख 75 हजार रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. सध्याच्या स्थितीत भाडे भरणे आणि दुरुस्ती करणे शक्य होणार नाही. कारण स्टेडियममधील सर्वच साहित्यांची दुरुस्ती करून ती कार्यान्वित करण्यासाठी सुमारे 80 लाखांहून अधिक खर्च अपेक्षित आहे. 11 महिन्यांच्या भाडे करारासाठी अशा प्रकारची आर्थिक जोखीम घेणे व्यवहार्य होणार नाही. त्यामुळे प्रशासनाने यावर विचार करावा.

– आनंद बोराडे, नेमबाज प्रशिक्षक

या शूटिंग रेंजबाबत महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली आहे. त्यानुसार आमच्या विभागाने 5 मे रोजी भवन विभागाला पत्र देऊन खर्चाचे अंदाजपत्रक तयार करण्यास सांगितले आहे. भवन विभागाच्या अधिकार्‍यांनीही सदर स्टेडियमची पाहणी केली असून, अपेक्षित खर्चाचा अहवाल तयार करण्याचे काम सुरू आहे. लवकरच त्यावर योग्य ती कार्यवाही होईल.

– संतोष वारुळे, उपायुक्त, क्रीडा विभाग, पुणे मनपा

Back to top button