AB de Villiers : डिव्हिलियर्सचे IPL मध्ये होणार पुनरागमन! 2023 मध्ये RCB मध्ये होणार एन्ट्री

AB de Villiers : डिव्हिलियर्सचे IPL मध्ये होणार पुनरागमन! 2023 मध्ये RCB मध्ये होणार एन्ट्री
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या इतिहासात 2022 च्या सीझनमध्ये टीव्ही रेटिंगमध्ये घसरण होण्याची ही कदाचित पहिलीच वेळ होती. यावर बीसीसीआयसह अनेक दिग्गजांनी चिंता व्यक्त केली. ख्रिस गेल आणि एबी डिव्हिलियर्स (AB de Villiers) या मोसमात खेळले नाहीत हेही यातील सर्वात मोठे कारण मानले जाते अशीही क्रिकेट चाहत्यांच्या वर्तृळात चर्चा आहे.

पण आता चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. दक्षिण आफ्रिकेचा तडाखेबाज फलंदाज आणि मिस्टर 360 म्हणून ओळख असलेला एबी डिव्हिलियर्स (AB de Villiers) पुढील आयपीएल हंगामात दिसण्याची शक्यता आहे. पण तो खेळाडू म्हणून नव्हे तर प्रशिक्षक किंवा मार्गदर्शक म्हणून कोहलीच्या संघाकडून मैदानात उपस्थित असेल. खुद्द डीव्हिलियर्सनेच याबाबत संकेत दिले आहेत.

'पुढील आयपीएल हंगामात मी उपलब्ध असेन, हे निश्चित'

एबी डिव्हिलियर्सलाने (AB de Villiers) एका मुलाखतीदरम्यान आयपीएल 2023 स्पर्धेतील उपस्थितीविषयी मोठा खुलासा केला. तो पुढील आयपीएल हंगामात प्रशिक्षक किंवा मार्गदर्शक म्हणून दिसणार आहे का? असा प्रश्न त्याला विचारण्यात आला. यावर आफ्रिकन स्टार म्हणाला, 'खरं सांगायचं तर मी अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. मात्र पुढील आयपीएलमध्ये मी उपलब्ध होणार हे निश्चित आहे. तिथे किती क्षमता असेल याची खात्री नाही, पण मी तिथे असेन. मला ट्विटरवरील चाहत्यांच्या चर्चेतून समजले की मी आरसीबीच्या कॅम्पमध्ये सामील होऊ शकतो. त्यामुळे मला माझ्या दुसऱ्या घरी अर्थात बंगळूरला परतायला आणि चिन्नास्वामीच्या खचाखच भरलेल्या स्टेडियममध्ये सामना पाहायला आवडेल.'

38 वर्षीय एबी डिव्हिलियर्स आणि ख्रिस गेल हे रॉयल चॅलेंजर्स बंगळूर (RCB) हॉल ऑफ फेममध्ये समाविष्ट होणारे पहिले दोन क्रिकेटपटू ठरले आहेत. फ्रँचायझीने 17 मे रोजी या बातमीची पुष्टी केली. विशेष बाब म्हणजे हॉल ऑफ फेम लाँच करणारी RCB ही IPL मधील पहिलीच फ्रँचायझी ठरली आहे.

डीव्हिलियर्सने आरसीबीसाठी 157 सामने खेळले

एबी डिव्हिलियर्सने आयपीएलमध्ये आरसीबीसाठी एकूण 156 सामने खेळले. ज्यामध्ये त्याने 2 शतके आणि 37 अर्धशतकांच्या मदतीने 4491 धावा केल्या आहेत. त्याच वेळी, ख्रिस गेल, ज्याला टी-20 क्रिकेटमधील सर्वात धोकादायक फलंदाजांपैकी एक म्हटले जाते, त्याने आरसीबीसाठी 91 सामने खेळले आणि 3420 धावा केल्या आहेत. ज्यात 5 शतके आणि 21 अर्धशतकांचा समावेश आहे.

गेल पुढील आयपीएल सीझन खेळू शकतो

अलीकडेच ख्रिस गेलने एका मुलाखतीत सांगितले की, 'गेल्या काही वर्षांत आयपीएलमध्ये मला चांगली वागणूक दिली गेली नाही, हे माझ्या लक्षात आले आहे. मग मला वाटले की या खेळात आणि आयपीएलमध्ये इतकं काम करूनही जर तुम्हाला योग्य तो सन्मान मिळाला नाही, तर मी मेगा लिलावात माझं नाव समाविष्ट करणार नाही. मी आयपीएल सोडून जाण्यामागचे ते एकमेव कारण होते. क्रिकेटनंतरही जीवन आहे आणि मी त्यात जुळवून घेण्याचा प्रयत्न करत आहे, असेही त्याने स्पष्ट केले होते.

आयपीएलमध्ये खेळण्याबाबत गेल म्हणाला, 'पुढच्या वर्षी मी पुनरागमन करेन. त्यांना माझी गरज आहे. आयपीएलमध्ये मी केकेआर, आरसीबी आणि पंजाब या तीन संघांचे प्रतिनिधित्व केले आहे. आरसीबी आणि पंजाब यांच्यापैकी एका संघात राहून जेतेपद पटकावायला जोरदार प्रयत्न करेन.'

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news