horse riding: ऑलिम्पिकमध्‍ये भारताच्‍या फवाद मिर्झाबराेबर असणार्‍या घोडीची किंमत माहीत आहे? | पुढारी

horse riding: ऑलिम्पिकमध्‍ये भारताच्‍या फवाद मिर्झाबराेबर असणार्‍या घोडीची किंमत माहीत आहे?

पुढारी ऑनलाईन डेस्क:  टोकिओ ऑलिम्पिक साठी १२० खेळाडू भारतातून गेले आहेत. या खेळाडूंमध्ये एक घोडीही(horse riding) सहभागी झाली आहे. दयारा -४ असे तिचे नाव असून टोकिओ ऑलिम्पिकमधील (horse riding) तिच्या कामगिरीकडे लक्ष लागले आहे. कारण दयाराने अंतिम फेरीत प्रवेश मिळविला आहे.

फवाद मिर्झा हा घोडेस्वार तिच्यासोबत खेळणार असून अवघ्या १० वर्षांची दयारा -४ आजपर्यंत २३ स्पर्धांपैकी पाचवेळा जिंकली आहे.

दयारा -४ तपकिरी रंगाची असून जर्मन वंशाची आहे. फवाद मिर्झा याला स्पॉन्सर करणाऱ्या एम्बसी रायडिंग स्कूलने तिला दोन वर्षांपूर्वी विकत घेतली आहे.

दयाराला एम्बसी ग्रुपने तब्बल २ लाख, ७५००० युरोला विकत घेतले होते. एका युरोची किंमत ७४ रुपये आहे. यावरून तिची किंमत करू शकता.

एम्बसी ग्रुपचे दोन घोडे ऑलिम्पिसाठी पात्र ठरले होते. मात्र, दयारा -४ हीच या स्पर्धेत अव्वल कामगिरी करू शकते, असा विश्वास असल्याने घोडेस्वार फवाद याने दयारासह खेळण्याचा निर्णय घेतला.

घोड्यासोबत हवे नाते घट्ट

अन्य खेळांपेक्षा अश्वारोहन हा खेळ वेगळा आहे. यात घोडेस्वार आणि घोडा यांचा कस लागतो.

जर घोड्याशी घोडेस्वाराचे नाते चांगले असेल तर खेळ चांगला होऊ शकतो.

घोड्याशी नाळ जुळण्यासाठी त्याला त्याच्यासोबत काळ घालावावा लागतो. फवाद दयारासोबत बराच वेळ व्यतीत करतो. तो तिचा खराराही करतो.असं केल्याने घोड्याचा विश्वास कमावता येतो. त्यासाठी तिला खाऊ घालणं, काळजी घेणं, थोपटणं असं करावं लागतं, असेही फवाद सांगतो.

घोड्यालाही व्हावे लागले क्वारंटाईन

फवाद मिर्झा हा मुळचा बेंगलोरचा. तो सध्या जर्मनीत असून तेथे तो सराव करत होता. टोकिओ ऑलिम्पिकला गेल्यानंतर त्याला घोड्यासह क्वारंटाइन व्हावे लागले.

सात दिवसांचा कालावधी संपल्यानंतर दयारा स्पर्धेत भाग घेऊ शकली.

गेल्या वर्षात दयाराला केवळ सराव करता आला. केवळ पाचच स्पर्धा झाल्या. सध्या तिचा चांगला सराव झाला आहे.

असून इटली येथील स्पर्धेत पाचवे, पोलंडमधील स्पर्धेत दुसरे आणि तिसरे स्थान पटकावले आहे.

वीस वर्षांची प्रतीक्षा

फवादच्या रुपानं दोन दशकांनंतर पहिल्यांदाच एखादा घोडेस्वार ऑलिंपिकमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे.

याआधी दिवंगत विंग कमांडर आय. जे. लांबा यांनी १९९६ साली अटलांटा ऑलिंपिकमध्ये अश्वारोहणात भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं.

तर २००० मध्ये सिडनी ऑलिंपिकमध्ये इम्तियाझ अनीस यांना प्रवेश मिळाला होता.

या स्पर्धेत फवाद मिर्झा वैयक्तिक इव्हेंटिंग प्रकारात भारताचं प्रतिनिधित्व करत आहे.

गेल्या वर्षी दक्षिण आणि पूर्व आशिया-ओशिनिया गटाच्या जागतिक क्रमवारीत तो प्रथमक्रमांकावर आहे. त्यामुळे तो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला.

हेही वाचलं का ?

Back to top button