Virat and Golden Duck : विराट कोहली 'गोल्‍डन डक'वर म्‍हणाला, "क्रिकेटमध्‍ये मी ..." | पुढारी

Virat and Golden Duck : विराट कोहली 'गोल्‍डन डक'वर म्‍हणाला, "क्रिकेटमध्‍ये मी ..."

पुढारी ऑनलाईन डेस्‍क :

विराट कोहलीला नेमकं झालयं तरी काय?, असा प्रश्‍न त्‍याचे चाहते विचारत आहेत. रन मशिन अशी ओळख असणार्‍या विराटची यंदाच्‍या आयपीएलमधील कामगिरी अत्‍यंत सुमार राहिली आहे. या सीजनपूर्वीच त्‍याने रॉयल चॅलेंजर्स बंगळूरचे कर्णधारपद सोडले. यानंतर तो आपल्‍या फलंदाजीवर लक्ष केंद्रीत करेल, असे मानले जात होते. मात्र यंदा तो तब्‍बल तीनवेळा ‘गोल्‍डन डक’ झाला आहे. याबाबत सर्वांनी प्रतिक्रिया दिल्‍यानंतर आता विराटनेही आपल्‍या गेलेल्‍या फॉर्मबाबतचे मौन सोडले आहे. ( Virat and Golden Duck )

यंदाच्‍या आयपीएल सीझनमध्‍ये विराट कोहलीने १२ सामन्‍यांमध्‍यफे केवळ सरासरी १९.६४ ने १९४ धावा केल्‍या आहेत. विराट आयपीएल स्‍पर्धेत आतापर्यंत सहा वेळ ‘गोल्‍डन डक’ झाला आहे. यंदाच्‍या सीझनमध्‍ये तो सनरायझर्स हैदराबादविरुद्‍धच्‍या सामन्‍यात दोनवेळा तर लखनौ जायंट्‍सविरुद्‍ध एका सामन्‍यात ‘गोल्‍डन डक’ झाला. याबाबत कोहलीने म्‍हटलं की, “पहिल्‍या चेंडूवर बाद होणे. यानंतर त्‍याची पुनरावृत्ती झाल्‍यामुळे पूर्णपणे हतबल झाल्‍यासारखे वाटते. आजवरच्‍या माझ्‍या क्रिकेट कारकीर्दीत असे कधीच घडलेलं नाही. मला असे वाटतं की, मी सारे काही पाहिलं आहे. खूप वर्ष मी क्रिकेट खेळलो आहे. या काळात मी क्रिकेट खेळातील सर्व बाजू पाहिल्‍या आहेत.”

Virat and Golden Duck :  ‘गोंगाट’ टाळण्‍यासाठी टीव्‍हीचा आवाज बंद करतो

माझ्‍या फॉर्म बदल क्रिकेट विश्‍लेषक आणि तज्‍ज्ञ बोलत असतात मात्र मी त्‍याचे कधीच दडपण घेत नाही. मला नेमकं काय वाटते ते बोलणारे कधीच समजू शकत नाहीत. ते हा क्षण जगू शकत नाहीत. त्‍यामुळे मी बाहेरचा गोंगाट टाळण्‍यासाठी
टीव्‍हीचा आवाज बंद करतो, असे सूचक विधान करत टीकाकाराकडे लक्ष देत नसल्‍याचे विराटने स्‍पष्‍ट केले.

गोल्डन डक म्हणजे काय?

गोल्डन डक : फलंदाज पहिल्याच चेंडूवर आऊट होतो त्याला क्रिकेट विश्वात गोल्डन डक, असे म्हणतात. क्रिकेटमध्ये डकचे एकूण तीन प्रकार आहेत त्यामध्ये रेग्युलर डक, गोल्डन डक आणि डायमंड डकचा समावेश होतो.

रेग्युलर डक : जेव्हा फलंदाज एकही धाव न घेता बाद होतो, त्याला रेग्युलर डक असे म्हणतात.

गोल्डन डक म्हणजे जेव्हा गोलंदाज फलंदाजाला पहिल्याच चेंडूवर आऊट होतो त्याला क्रिकेट विश्वात गोल्डन डक असे म्हणतात.

डायमंड डक : जेव्हा फलंदाज सामन्यात एकही चेंडू न खेळता ( धावचीत ) होतो त्याला डायमंड डक म्हणतात.

आयपीएलमध्ये विराट कोहली गोल्डन डक्स : कंसात विराटची विकेट घेतलेले गोलंदाज

विरूध्द मुंबई इंडियन्स, चिन्नास्वामी स्टेडियम, बेंगळूर २००८ (आशिष नेहरा)
विरूध्द पंजाब किंग्ज, चिन्नास्वामी स्टेडियम, बेंगळूर २०२२ (संदीप शर्मा)
विरूध्द केकेआर, ईडन गार्डनस्, कोलकाता २०२२ (नॅथन कुल्टर-नाईल)
विरूध्द लखनौ, डी.वाय.पी स्टेडियम मुंबई, २०२२ (दुष्मंता चमीरा)
विरूध्द हैदराबाद, ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबई, २०२२ (मार्को जॅनसेन)
वि हैदराबाद, वानखेडे स्टेडियम, मुंबई २०२२ (जे सुचिथ)

 

हेही वाचा : 

पाहा व्‍हिडीओ :

 

 

 

Back to top button