England vs India : अजिंक्य रहाणेचा आत्मघात, पाच धावांवर धावबाद | पुढारी

England vs India : अजिंक्य रहाणेचा आत्मघात, पाच धावांवर धावबाद

नॉटिंगहॅम : पुढारी ऑनलाईन

भारत आणि इंग्लंड ( England vs India ) यांच्यातील पहिल्या कसोटीत पहिले सत्र सांभाळून खेळणाऱ्या भारताला दुसऱ्या सत्रात मात्र पाठोपाठ धक्के बसले. चेतेश्वर पुजारा, विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे हे तीन अनुभवी फलंदाज अवघ्या आठ धावांच्या अंतरात बाद झाले. इंग्लंडच्या जेमी अँडरसनने पुजारा कोहली यांना पाठोपाठच्या चेंडूवर बाद करत भारताला बॅकफूटवर ढकलले. त्यानंतर अजिंक्य रहाणेनेही अवघ्या ५ धावा करुन स्वतःचा आत्मघात करुन घेतला. तो धावबाद झाला. दरम्यान पावसाने दमदार हजेरी लावल्याने सामना थांबवण्यात आला. पाऊस बराच काळ कोसळत असल्याने दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबवण्यात आला. खेळ थांबला त्यावेळी भारताच्या ४६.४ षटकात ४ बाद १२५ धावा झाल्या होत्या.

पहिले सत्र : हत्ती आला आणि शेपूट अडकली ( England vs India )

भारत आणि इंग्लंड ( England vs India ) यांच्यातील पहिल्या कसोटीत दुसऱ्या दिवशी भारताने बिनबाद २१ धावांपासून पुढे खेळण्यास सुरुवात केली. रोहित शर्मा आणि केएल राहुल या सलामी जोडीने इंग्लंडच्या गोलंदाजांना कोणतीही संधी न देता भारताचे अर्धशतक पार करुन दिले.

संघाच्या अर्धशतकानंतर केएल राहुल याने धावांचा वेग वाढवला. दुसऱ्या बाजूने रोहित शर्मा देखील धावांची गती वाढवण्याचा प्रयत्न करत होता. हे दोघे जण शतकी सलामी देणार असे वाटत असतानाच रॉबिन्सनने रोहित शर्माला ३६ धावांवर बाद केले. त्यामुळे लंचपूर्वी इंग्लंडला एक यश मिळाले.

भारताने दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रात ७३ धावा जोडल्या. मात्र सत्र संपता संपता रोहित शर्माच्या रुपाने सेट झालेला फलंदाजही गमावला. भारताने लंचपर्यंत ९७ धावांपर्यंत मजल मारली.

दुसरे सत्र : विराट आल्या पावली परतला

भारताने दुसऱ्या सत्राची सुरुवात शतक पार करुन केली. रोहित बाद झाल्यानंतर चेतेश्वर पुजारा केएल राहुलची साथ देण्यासाठी खेळपट्टीवर आला. पण, त्याला फार काळ विकेटवर तग धरता आला नाही. तो १६ चेंडू खेळून अवघ्या ४ धावा करत माघारी परतला. त्याला अँडरसनने बाद केले.

पुजारा बाद झाल्यानंतर कर्णधार विराट कोहली संघाला सावरण्यासाठी मैदानात आला. पण, अँडरसनने त्याला आल्या पावली माघारी पाठवले. त्यामुळे भारताची अवस्था १ बाद १०४ वरुन ३ बाद १०४ अशी झाली. या बिकट परिस्थित केएल राहुलने आपले अर्धशतक पूर्ण करुन घेतले.

भारताच्या दुसऱ्या सत्रात पाठोपाठ  विकेट पडत असल्याने डाव सावरण्याच्या जबाबदारी उपकर्णधार अजिंक्य रहाणेवर होती. पण, ५ धावा झाल्यानंतर चोरटी धाव घेण्यासाठी केलेल्या घाईने त्याचा आत्मघात झाला. तो धावबाद झाला.  त्यानंतर अंधुक प्रकाशामुळे खेळ थांबवण्यात आला. काही वेळाने पाऊसही पडण्यास सुरुवात झाली.

या पावसात दुसऱ्या दिवसाचा उर्वरित खेळ वाहून गेला. खेळ थाबला त्यावेळी भारताच्या ४६.४ षटकात ४ बाद १२५ धावा झाल्या होत्या. केएल राहुल ५७ वर तर ऋषभ पंत ७ धावा करुन नाबाद होते. भारत पहिल्या डावात अजून ५८ धावांनी पिछाडीवर आहे.

England vs India Live Update : 

पावसामुळे दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला, तिसरे सत्र पाण्यात

टीम इंडिया ५८ धावांनी पिछाडीवर

अंधुक प्रकाशामुळे खेळ थांबला, भारताच्या ४६.१ षटकात ४ बाद १२५ धावा

४५ षटकात भारताच्या ४ बाद ११५ धावा, भारत अजून ६८ धावांनी पिछाडीवर

अजिंक्य रहाणेचा आत्मघात, ५ धावांवर धावबाद

केएल राहुलचे अर्धशतक पूर्ण

४१ षटकात भारताच्या ३ बाद १०४ धावा

विराट कोहली शुन्यावर बाद

अँडरसनचा भारताला पाठोपाठ तिसरा धक्का

पुजारा ४ धावा करुन बाद, भारताला दुसरा धक्का

भारताचे शतक पार

लंच ब्रेकपर्यंत भारताच्या ३७.३ षटकात १ बाद ९७ धावा

रोहित शर्मा ३६ धावा करुन बाद, भारताला पहिला धक्का

केएल राहुल अर्धशतकाच्या समिप

३० षटकात भारताच्या बिनबाद ६३ धावा

२८ षटकात भारताच्या बिनबाद ५२ धावा

भारताच्या २१ षटकात बिनबाद ३२ धावा

भारताची मदार रोहित शर्मा आणि केएल राहुल यांच्यावर

हेही वाचले का? 

पाहा व्हिडिओ : प्रियांका चोप्रालाही आवडली कोल्हापूरची स्ट्राँग वूमन

Back to top button