PBKS vs CSK IPL 2022 : चर्चा वेगवान गोलंदाज ऋषि धवनच्‍या 'हटके' मास्‍कची | पुढारी

PBKS vs CSK IPL 2022 : चर्चा वेगवान गोलंदाज ऋषि धवनच्‍या 'हटके' मास्‍कची

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : आयपीएल २०२२ मध्‍ये सोमवारी पंजाब किंग्‍सने आपल्‍या वेगवान गोलंदाजीच्‍या बळावर चेन्‍नई सुपर किंग्‍सचा ११ धावांनी पराभव केला. या सीजनमधील पंजाबचा हा चौथा विजय आहे. या सामन्‍यात चर्चेचा विषय ठरला तो पंजाबचा वेगवान गोलंदाज ऋषि धवनच्‍या मास्‍कची. काचेचे गार्ड असणारा हा मास्‍क ऋषिने का घातला? याची उत्‍सुकता सर्वांना लागून राहिली होती. ( PBKS vs CSK, IPL 2022)

सोमवारी मुंबईतील वानखेडे स्‍टेडियममध्‍ये चेन्‍नई विरुद्‍धच्‍या सामन्‍यात पंजाबने संघात तीन बदल केले. संघात वेगवान गोलंदाज संदीप शर्मा आणि ऋषि धवनला स्‍थान देण्‍यात आले. हिमाचल प्रदेशचा ऋषि धवन या सीजनमध्‍ये प्रथमच मैदानात उतरला. यावेळी त्‍याने घातलेल्‍या मास्‍ककडे सर्वांचे लक्ष वेधले. धवन याने गोलंदाजी करताना हा मास्‍क का घातला, असा प्रश्‍न प्रत्‍येकजण विचारु लागला. जाणून घेवूया या मास्‍कविषयी…

धवन याने विजय हजारे ट्रॉफीतील कामगिरी लक्षवेधी ठरली होती. हिमाचल प्रदेशला ही ट्रॉफी मिळवून देण्‍यात त्‍याचे मोठे योगदान होते. तब्‍बल सहा वर्षानंतर त्‍याने आयपीएलमध्‍ये कमबॅक केले. २०१६ मध्‍ये तो पंजाबकडून आयपीएलमधील शेवटचा सामना खेळला होता. यंदा पंजाब किग्‍सने त्‍याच्‍यावर ५५ लाखांची बोली लावली होती.

PBKS vs CSK, IPL 2022 : गोलंदाजी करताना का घातला मास्‍क?

जखमी असल्‍यामुळे धवन हा आयपीएल २०२२ मधील सुरुवातीच्‍या सामन्‍यांमध्‍ये खेळू शकला नव्‍हता. रणजी ट्रॉफीमध्‍ये खेळताना त्‍याच्‍या नाकाला दुखापत झाली होती. त्‍यानंतर त्‍याच्‍या नाकावर शस्‍त्रक्रिया करण्‍यात आली. त्‍यामुळे विश्रांतीनंतर नाकावर मास्‍क लावूनच तो मैदानात उतरला. नाकाला पुन्‍हा दुखापत होवू नये याची खबरदारी घेण्‍यासाठी
त्‍याने हा मास्‍क लावला होता. यावेळी त्‍याने दमदार गोलंदाजी केली. त्‍याने सर्वप्रथम शिवम दुबे याच्‍या त्रीफळा उडवल्‍या. तर अखेरच्‍या षटकात त्‍याने महेंद्र सिंह धोनी याची विकेट घेतली.

धवन याने सामन्‍याच्‍या सुरुवातीलाच आपल्‍याला झालेल्‍या जखमीची माहिती दिली होती. पंजाब किंग्‍सने शेअर केलेल्‍या
व्‍हिडीओमध्‍ये त्‍याने म्‍हटले होते की, “मी खेळण्‍यासाठी सज्‍ज आहे. चार वर्षानंतर मी आयपीएलमध्‍ये खेळत आहे. मात्र रणजी ट्रॉफीमध्‍ये जखमी झाल्‍याने मी निराश होतो. दुखापत झाल्‍यानेच मला चार सामने बाहेर राहावे लागले. आता मी खेळण्‍यासाठी सज्‍ज आहे. ”

हेही वाचलं का?

पाहा व्‍हिडीओ : 

 

 

Back to top button