Parag Agrawal and Musk : ट्विटरच्‍या सीईओ पराग यांना हटविल्‍यास मस्‍क यांना पडणार महागात!, द्‍यावी लागेल ‘एवढी’ रक्‍कम | पुढारी

Parag Agrawal and Musk : ट्विटरच्‍या सीईओ पराग यांना हटविल्‍यास मस्‍क यांना पडणार महागात!, द्‍यावी लागेल 'एवढी' रक्‍कम

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : पुढारी ऑनलाईन डेस्क : जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती असणारे एलॉन मस्कचे यांनी सोशल मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटर मालकीचे झाले आहे. टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क आणि ट्विटर इंक यांच्यामध्ये ४४ अब्ज अमेरिकन डॉलर्सला व्यवहार झाला. एलॉन मस्क यांनी ट्विटर इंकमध्ये ५४.२० डॉलर रोखीमध्ये प्रति शेअर विकत घेतला आहे. आता कंपनीचे सीईओ पराग अग्रवाल यांना हटवले तर एलॉन मस्‍क यांना भलतेच महागात पडणार आहे. (Parag Agrawal and Musk )

Parag Agrawal and Musk : पराग यांना पद साेडण्‍यास सांगितल्‍यास…

कंपनी मालकीची झाल्‍यानंतर मस्‍क यांनी सीईओ पराग अग्रवाल यांना १२ महिन्‍यांच्‍या आत हटविले तर त्‍यांना तब्‍बल ४२ मिलियन डॉलर म्‍हणजे ३.२ अब्‍ज रुपये मोजावे लागणार आहेत. अग्रवाल यांना १२ महिन्‍यांच्‍या आत पद सोडण्‍यास सांगितले तर ट्विटर इंक कंपनीला त्‍यांना ३.२ अब्‍ज रुपये द्‍यावे लागणार आहेत, असे रिसर्च फर्म इक्‍विलरच्‍या अहवालात म्‍हटलं आहे.

पराग अग्रवाल हे कंपनीचे पहिले मुख्‍य टेक्‍नोलॉजी अधिकारी होते. यानंतर नोव्‍हेंबर २०२१ मध्‍ये त्‍यांची ट्विटरच्‍या सीईओपदी नियुक्‍ती झाली होती. त्‍यांना मागील वर्षी ३०.४ मिलियन डॉलर एवढे वेतन मिळाले. मात्र  यासंदर्भात कंपनीने अधिकृत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

कंपनी विकत घेतल्‍याचे मस्‍क यांनीच सोमवारी रात्री जाहीर केले होते. मात्र १४ एप्रिल रोजी कंपनीच्‍या बैठकीस सहभागी होण्‍यास त्‍यांनी नकार दिला होता. कंपनीच्‍या व्‍यवस्‍थापनावर माझा विश्‍वास नसल्‍याचे त्‍यांनी म्‍हटले होते. त्‍यामुळे आता असे मानले जात आहे की, मस्‍क व्‍यवस्‍थापनातील महत्त्‍वाची व मुख्‍य पदावरील अधिकार्‍यांना हटवतील. मात्र यासाठी त्‍यांना भरपाई म्‍हणून  माेठी किंमत माेजावी लागणार आहे.

हेही वाचा :

 

Back to top button