Prithvi Shaw : छोटा पॅकेट ‘पृथ्वी’ने मोडला विरेंद्र सेहवागचा ‘हा’ विक्रम!

Prithvi Shaw : छोटा पॅकेट ‘पृथ्वी’ने मोडला विरेंद्र सेहवागचा ‘हा’ विक्रम!
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) आयपीएल 2022 च्या पहिल्या काही सामन्यांमध्ये लयीत दिसला नाही. परंतु आता त्याने वेग पकडला आहे. काल केकेआर विरुद्ध झालेल्या सामन्यात पृथ्वीने 29 चेंडूंमध्ये 2 षटकार आणि 7 चौकारांच्या मदतीने जलद 51 धावा केल्या. आयपीएल 2022 मधील हे त्याचे दुसरे तर आयपीएल कारकिर्दीतील 12वे अर्धशतक आहे. शॉने डेव्हिड वॉर्नरसह दिल्लीसाठी डावाची सुरुवात केली आणि पहिल्या विकेटसाठी 8.4 षटकांत 93 धावांची भागीदारी केली. दोघांच्या तुफानी खेळीच्या जोरावर दिल्लीने केकेआरविरुद्ध 20 षटकांत 5 बाद 215 अशी मोठी धावसंख्या उभारली. वॉर्नरनेही 61 धावांचे योगदान दिले.

पृथ्वी शॉने (Prithvi Shaw) लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध 61 धावांची शानदार खेळी खेळली होती. आता केकेआरविरुद्ध त्याने 51 धावा करत सलग दुसरे अर्धशतक फटकावले. या खेळीच्या जोरावर त्याने माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागचा विक्रम मोडीत काढला आहे. पॉवरप्लेमध्ये सर्वात जलद 1000 धावा करणारा भारतीय फलंदाज म्हणून पृथ्वी शॉ आता आयपीएलमध्ये दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. पृथ्वीने या लीगमधील पॉवरप्लेमध्ये 57 डावांमध्ये 1000 धावा पूर्ण केल्या. सेहवागने आयपीएलमधील 59 डावांमध्ये हा पराक्रम केला होता. केएल राहुल हा भारतीय फलंदाज म्हणून या लीगमधील सर्वात कमी डावात पॉवरप्लेमध्ये 1000 धावा पूर्ण करणारा फलंदाज आहे.

आयपीएलमधील सर्वात कमी डावात पॉवरप्लेमध्ये 1000 धावा पूर्ण करणारे आघाडीचे 6 फलंदाज

56 डाव – केएल राहुल
57 डाव – पृथ्वी शॉ (Prithvi Shaw)
59 डाव – वीरेंद्र सेहवाग
67 डाव – सचिन तेंडुलकर
67 डाव – सचिन तेंडुलकर
67 डाव – मुरली विजय

केकेआरविरुद्ध सर्वाधिक धावा

2018 मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केल्यापासून पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) केकेआरविरुद्ध सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत विराट कोहलीनंतर दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. कोलकाताविरुद्ध पृथ्वीची बॅट नेहमीच तळपत राहिली आहे. केकेआर विरुद्धच्या 7 सामन्यांच्या 7 डावात पृथ्वीने एकूण 392 धावा केल्या आहेत (62, 99, 14, 66, 82, 18, 51). विराट कोहलीने त्याच्यापेक्षा 395 धावा जास्त केल्या आहेत. केकेआरविरुद्धच्या सात डावांत पृथ्वीने 5 अर्धशतके झळकावली आहेत.

कोलकाता हा पृथ्वीचा आवडता संघ

पृथ्वी शॉला केकेआरविरुद्ध फलंदाजी करणे आवडते. त्याने केकेआरविरुद्ध 56 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. जे इतर संघांच्या तुलनेत सर्वात जास्त आहे. त्याचा स्ट्राईक रेटही कोलकाताविरुद्ध 171 आहे. पृथ्वीने केकेआरनंतर चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध 27.30 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. त्याचबरोबर सनरायझर्सविरुद्ध त्याने 26.38 च्या सरासरीने धावा केल्या आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news