

पुढारी ऑनलाईन डेस्क : IPL २०२२ हंगामात बुधवारी पुण्यात झालेल्या मुंबई इंडियन्स विरूध्द कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात सामना खेळवण्यात आला. या सामन्यासाठी मुंबई संघाचा मार्गदर्शक सचिन तेंडूलकर आणि किरण मोरेही पुण्यात उपस्थित होते. यावेळी या दोघांना पुण्याच्या ट्रॅफिक अडकले. याचा एक व्हिडिओ सचिन तेंडुलकरने शेअर केला आहे.
सचिन तेंडुलकरने एक व्हिडिओ शेअर केला आहे. तो आणि किरण मोरे कारमधून प्रवास करत आहेत. दोघेही कारमध्ये बसून मराठीगाणी गात त्यावर थिरकताना दिसत आहेत. सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करताना सचिन म्हणतो की, पुण्याला जाताना ट्रॅफिकमध्ये अडकलो; मग हे सुंदर गाणे ऐकण्याचा विचार केला. त्याचवेळी त्यांनी कॅप्शनमध्ये 'मी डोलकर डोलकर डोलकर दर्याचा राजा…पुण्याला करतोय ये जा…' असे लिहले आहे.
आयपीएल २०२२ हंगामातील तीन सामने खेळलेली मुंबईची टीम अजूनही विजयाच्या प्रतीक्षेत आहे. या हंगामात मुंबई इंडियन्सची सुरूवात अत्यंत खराब झाली आहे. सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये मुंबईला पराभवाचा सामना करावा लागला होता. तर कोलकाता विरूध्दच्या तिसऱ्या सामन्यातही मुंबईला पराभव पत्करावा लागला आहे.
हेही वाचा!