IND W vs SA W : 'नाे बाॅल' ठरला टीम इंडियावर भारी; थरारक सामन्‍यात टीम इंडिया पराभूत | पुढारी

IND W vs SA W : 'नाे बाॅल' ठरला टीम इंडियावर भारी; थरारक सामन्‍यात टीम इंडिया पराभूत

पुढारी ऑनलाईन डेस्‍क :  अखेच्‍या चेंडूपर्यंत रंगलेल्‍या सामन्‍यात दक्षिण आफ्रिकेने भारतावर मात केली. भारतासाठी अस्‍तित्‍वाची लढाई असणार्‍या या सामन्‍यात दोन्‍ही संघांनी उत्‍कृष्‍ट क्रिकेटचे प्रदर्शन केले. मात्र अखेर भारतीय खेळाडूंचे उपांत्‍य फेरीत धडक मारण्‍याचे स्‍वप्‍न भंगले.

शेवटच्‍या पाच षटकांमध्‍ये दक्षिण आफ्रिकेला ४५ धावांची गरज होती. भारताची सामन्‍यावर पकड मजबूत दिसत होती. मात्र पूजा वस्‍त्रकरच्‍या षटकात मिनॉन डुप्रीलाने सलग दोन चौकर लगावले. यानंतर राजेश्‍वर गायकवाडच्‍या षटकात तीन चौकार फटकावल्‍याने भारतीय संघ बॅकफूटवर गेला.  राजेश्‍वरीने ट्रेयानला झेलबाद केले. मात्र तोपर्यंत दक्षिण आफ्रिकेच्‍या संघाने सामन्‍यावरील पकड आणखी मजबूत केली हाोेती. धावांचा पाठलाग करताना एका बाजूला विकेट गमावत असताना मिग्‍नोन डू प्रीज दमदार खेळाचे प्रदर्शन घडवले. तिच्‍या अर्धशतकीमुळे दक्षिण आफ्रिका संघाचा मार्ग सुकर झाला.

दीप्‍तीचा नाे बाॅल आणि भारताचे स्‍वप्‍न भंगले

अखेरच्‍या षटकात तीन चेंडूत चार धावांची गरज हाेती. यावेळी दीप्‍तीने मिनॉन डुप्रीला हरमीनप्रीत कौरकडे झेल देणे भाग पाडले; पण हा नोबॉल ठरला आणि भारताचा विकेट घेतल्‍याचा आनंद क्षणभंगुर ठरला. यानंतर दक्षिण आफ्रिकेला सामना जिंकण्‍यासाठी दोन चेंडूवर केवळ दोन धावांची गरज हाेती. नोबॉलमुळे फ्री हिट मिळाली. या चेंडूवर एक धाव काढण्‍यात आली.   यानंतर अखेरच्‍या चेंडूवर चौकार लगावत दक्षिण आफ्रिकेने तीन गडी राखत सामना आपल्‍या खिशात घातला.

jhulan goswami : झुलनने रचला इतिहास!, ‘अशी’ कामगिरी करणारी पहिली महिला क्रिकेटपटू

दक्षिण आफ्रिकेच्‍या फलंदाजीची सुरुवात खराब झाली.  हरमनप्रीतने दक्षिण आफ्रिकेच्‍या स्‍टार फलंदाज लिजेल ली हिला रनाआउट केले. यानंतर लारा गुडॉल आणि लौरा वोल्‍वार्डटने शतक भागीदार केली. भारतीय संघ बॅकफूटवर केला. मात्र सलग दोन षटकांमध्‍ये सलग दोन विकेट घेत भारताने सामन्‍यात पुन्‍हा एकदा कमबॅक केले.  राजेश्‍वरी गायकडवाडने गुडॉल हिला ४९ धावांवर यष्‍टीचीत केले. तर हरमनप्रीतने लौराला ८० धावांवर त्रीफळाचीत केले. मात्र यानंतर मिग्‍नोन डू प्रीज हिने केलेल्‍या दमदार अर्धशतके खेळीने दक्षिण आफ्रिका संघाचा मार्ग सुकर झाला.

भारतीय फलंदाजांची दमदार कामगिरी

भारताने नाणेफेक जिंकल्‍यानंतर प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. शेफाली वर्मा ५३, स्‍मृति मंधानाने दमदार ७१, कर्णधार मिताली राजने ६८ तर हरमनप्रीत कौरने ४८ धावांची खेळी केली. भारताने ५० षटकांमध्‍ये सात विकेट गमावत २७४ धावा केल्‍या. दक्षिण आफ्रिकेच्‍या क्‍लास आणि इस्‍माइलने प्रत्‍येकी दोन बळी घेतले.

हेही वाचलं का?

 

 

Back to top button