T20 world record : ‘या’ महिला संघाने टी-२० सामन्यात बनवल्या विश्‍वविक्रमी ३१८ धावा | पुढारी

T20 world record : ‘या’ महिला संघाने टी-२० सामन्यात बनवल्या विश्‍वविक्रमी ३१८ धावा

पुढारी ऑनलाईन डेस्क : T20 क्रिकेटमध्ये (T20 world record) इतिहास रचला गेला आहे. बहरीन महिला क्रिकेट संघाने T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा चमत्कार केला आहे. 22 मार्च रोजी अल अमिरात क्रिकेट मैदानावर म्हणजेच मंगळवारी येथे खेळल्या गेलेल्या GCC महिला T20 चॅम्पियनशिप कप 2022 (GCC Women’s T20I Championship 2022) सामन्यात बहरीन महिला क्रिकेट संघाने सौदी अरेबियाविरुद्ध 20 षटकात १ गडी गमावून ३१८  धावा करत विश्‍वविक्रमी कामगिरी केली.T20 आंतरराष्ट्रीय (महिला व पुरुष) क्रिकेटमधील ही एखाद्या संघाची सर्वात मोठी धावसंख्या आहे.

बहरीनसाठी (T20 world record) दीपिका रसंगिकाने धुवाँधार बॅटिंग करत 66 चेंडूत नाबाद 161 धावा केल्या. या खेळीत दीपिकाने 31 चौकार मारले. यावेळी दीपिकाचा स्ट्राईक रेट 243 इतका होता तिने संघाला 318 पर्यंत नेण्यात माठे योगदान दिले. रसंगिकाशिवाय थरंगा गजानायकेने ९४ धावांची खेळी केली. दुसरे आश्चर्य  318 धावांचा डोंगराचा पाठलाग करताना सौदी अरेबियाचा महिला संघ 20 षटकात 8 विकेट गमावत अवघ्या 49 धावाच करू शकला. बहरीनच्‍या संघाने तब्बल २६९ धावांनी विजय मिळवला.

याआधी T20 महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा  विक्रम युगांडाच्या महिला संघाच्या नावावर होता. या संघाने 2019 मध्ये मालीविरुद्धच्या सामन्यात एकूण 314 धावा केल्या होत्या.

या सामन्यात बनले अनेक विक्रम (T20 world record)
  • सौदी अरेबिया आणि बहरीन यांच्यातील सामन्यादरम्यान अनेक विलक्षण विक्रमही केले गेले. टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 150 पेक्षा जास्त धावा करणारी दीपिका महिला क्रिकेटमधील पहिली फलंदाज ठरली.
  • बहरीन संघ २६९ धावांनी जिंकला, जो महिलांच्या T20 आंतरराष्ट्रीय मधील धावांनुसार दुसरा सर्वात मोठा विजय आहे.
  • या सामन्यात बहरीनच्या संघाने 318 धावा केल्या असल्या तरी त्यांच्याकडून एकही षटकार लागला नाही. पण या खेळीदरम्यान विक्रमी 50 चौकार मारले गेले.
  • दीपिका महिला T20 आंतरराष्ट्रीय मधील सर्वात मोठी खेळी खेळणारी फलंदाज ठरली आहे. तिने एलिसा हिलीचा विक्रम मोडला आहे. हिलीने महिला टी20 मध्ये नाबाद 148 धावांची खेळी केली आहे.

Back to top button