

पुढारी ऑनलाईन डेस्क : आयपीएल २०२२ (IPL 2022)ची सुरुवात शनिवारी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यातील सामन्याने होणार आहे. दरम्यान, भारतीय संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (ravi shastri) यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळावर (BCCI) नाराजी व्यक्त केल्याचे समोर येत आहे.
रवी शास्त्री (ravi shastri) हे आयपीएलमध्ये पुन्हा एकदा सक्रीय होणार आहेत. पण यावेळी ते एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहेत. ते कुठल्याही संघाचे मार्गदर्शक, प्रशिक्षक म्हणून कार्यरत नाहीत, पण ते यंदा कॉमेंट्रीच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहेत. दरम्यान, शास्त्री यांनी कॉमेंट्रीसाठी माईक हाती घेण्याआधीच एक कठोर विधान केले असून त्यामुळे अनेकांना धक्का बसला आहे.
रवी शास्त्री (ravi shastri) आयपीएलच्या १५ व्या सीझनमध्ये हिंदी कॉमेंट्री करणार आहेत. आयपीएलचे प्रसारण करणा-या स्टार स्पोर्टस वाहिनेने याबाबत काही दिवसांपूर्वीच याची माहिती जाहीर केली होती. २६ मार्चपासून आयपीएल सुरू होत असून प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. तत्पूर्वी रवी शास्त्री यांनी एका मुलाखतीदरम्यान काही मोठ्या गोष्टींचा उल्लेख केला आहे. गेल्या चार वर्षांत कॉमेंट्री करू न शकल्याने त्यांनी नियमांनाच मूर्खपणाचे म्हटले आहे. त्यांच्या वक्तव्यने क्रिकेट वर्तुळात खळबळ माजली आहे.
शास्त्री म्हणाले की, 'यंदा आयपीएलचा १५ सीझन आहे. मी पहिल्या हंगामापासून सलग ११ वर्षे आयपीएलमध्ये कॉमेन्ट्री केली. पण बीसीसीआयच्या हितसंबंधांच्या नियमामुळे मला टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक असेपर्यंत समालोचन करण्यापासून रोखण्यात आले. त्यामुळे गेली चार वर्षे मी कॉमेंट्रीपासून वंचित राहिलो.'
रवी शास्त्री यांच्याशिवाय CSK चा माजी खेळाडू सुरेश रैनाही कॉमेंट्री करताना दिसणार आहे. त्याच्याबद्दलही रवी शास्त्री यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, 'तुम्ही त्याला मिस्टर आयपीएल म्हणता, मी असहमत नाही. रैनाने आयपीएलमध्ये चमक दाखवली. एखाद्या संघासाठी सलग सीझन खेळणे ही एक मोठी प्रशंसा आहे. स्पर्धेच्या इतिहासातील सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंपैकी तो एक आहे.'
आणखी वाचा :