IPL History : आयपीएलमध्ये षटकार मारण्यात अपयशी ठरलेले ‘हे’ तीन फलंदाज माहीत आहेत का? | पुढारी

IPL History : आयपीएलमध्ये षटकार मारण्यात अपयशी ठरलेले ‘हे’ तीन फलंदाज माहीत आहेत का?

पुढारी ऑनलाईन डेस्क : IPL History : आयपीएल (IPL) हे एक व्यासपीठ आहे जिथून अनेक खेळाडूंनी त्यांच्या क्रिकेट करियरला सुरुवात केली आणि ते त्यांच्या देशाच्या राष्ट्रीय संघासाठीही खेळले. या व्यासपीठावरून अनेक खेळाडू उदयास आले. चांगल्या प्रदर्शनाच्या जोरावर त्यांना जागतिक क्रिकेटमध्ये नवी ओळख मिळाली. जगातील ही सर्वात लोकप्रिय टी २० (T20) स्पर्धेने नेहमीच खेळाडू आणि प्रेक्षकांना एक अद्भुत भेट दिली आहे. भारताच्या प्रत्येक खेळाडूचे या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत खेळण्याचे स्वप्न असते. त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्टार खेळाडूही या स्पर्धेत सहभागी होण्यास धडपडत असतात.

या थरारक स्पर्धेत चौकार-षटकारांचा अक्षरश: पाऊस पडत असतो. त्यामुळे स्टेडियमवरील प्रेक्षकांसह टीव्ही वाहिनीवर सामना पाहणा-या आयपीएल चाहत्यांचे भरपूर मनोरंजन होते. सामना रंगदार वळणार गेल्यास फलंदाजांशिवाय गोलंदाजही संधी मिळाल्यास चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवण्यास मागेपुढे पाहत नाहीत. त्यावेळचा खेळातील रोमहर्षकपणा पहाण्यासारखा असतो. (IPL History)

गेल, रोहित शर्मा, एबी डिव्हिलियर्स, आंद्रे रसेल, ऋषभ पंत यांसारखे अनेक दिग्गज खेळाडू षटकार मारून धावा करतात आणि प्रेक्षकांचेही भरपूर मनोरंजन केले जाते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे इतक्या झटपट धावा करूनही काही खेळाडू असे आहेत की ज्यांनी आयपीएलमध्ये कधीही षटकार मारला नाही. वेगवान खेळी करताना फलंदाज एक-दोन चेंडूंचा मुकाबला करतानाही षटकार ठोकतो. पण असे तीन फलंदाज आहेत ज्यांना खूप चेंडू खेळण्याची संधी मिळाली आहे, पण त्यांना कधीही षटकार मारता आला नाही. (IPL History)

झटपट खेळ करण्यासाठी आयपीएलच्या लिलावात खेळाडूला चांगली किंमत देऊन विकत घेतले जाते आणि तो खेळाडू चांगला खेळ दाखवेल अशीही अपेक्षा असते. बर्‍याच वेळा गोष्टी अपेक्षेप्रमाणे घडत नाहीत आणि या खेळाडूंच्या बाजूनेही तेच दिसून आले. आता या सर्वांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधूनही निवृत्ती घेतली आहे. अशा तीन खेळाडूंबाबत आज आपण चर्चा करूया, ज्यांना एकही षटकार फटकावता आलेला नाही. (IPL History)

मायकेल क्लिंगर

ऑस्ट्रेलियन खेळाडू मायकेल क्लिंगरला आयपीएल २०११ मध्ये कोची टस्कर्स केरळकडून खेळण्याची संधी मिळाली. आयपीएलच्या त्या हंगामात क्लिंगरला ७७ चेंडू खेळण्याची संधी मिळाली, पण तो एकही चेंडू षटकाराच्या रुपात प्रेक्षकांपर्यंत पोहोचवू शकला नाही.

Michael Klinger is bowled | Photo | Indian Premier League | ESPNcricinfo.com

मायकेल क्लार्क

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकेल क्लार्कला २०१२ मध्ये पुणे वॉरियर्स इंडियाकडून खेळण्याची संधी मिळाली. आयपीएलच्या त्या हंगामात त्याला एकूण ९४ चेंडू खेळण्याची संधी मिळाली पण त्याला एकही षटकार मारता आला नाही. पंधरा षटकांपेक्षा जास्त खेळूनही षटकार न मारता आल्याने आश्चर्यस्पद अशी त्याची कामगिरी आहे. क्लार्क हा जागतिक क्रिकेटमधील दिग्गज खेळाडू मानला जातो, परंतु तो आयपीएलमध्ये कधीही षटकार ठोकू शकला नाही.

IPL 2019: Five International captains who failed in the tournament

कॅलम फर्ग्युसन

या कांगारू खेळाडूला २०११ आणि १२ आयपीएलमध्ये पुणे वॉरियर्स इंडियाकडून खेळण्याची संधी मिळाली. या फलंदाजाने आयपीएलच्या इतिहासात एकही षटकार न मारता सर्वाधिक चेंडू खेळले आहेत. ११७ चेंडू खेळूनही फर्ग्युसनला आयपीएलमध्ये एकही षटकार मारता आला नाही. सुमारे वीस षटके खेळूनही षटकार मारता न येणे ही धक्कादायक बाब म्हणावी लागेल.

Ferguson heads north to Thunder for BBL | cricket.com.au

Back to top button