women’s world cup 2022 : सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी भारतासमोर खडतर आव्हान | पुढारी

women's world cup 2022 : सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी भारतासमोर खडतर आव्हान

पुढारी ऑनलाईन डेस्क : आयसीसी महिला विश्वचषक 2022 (women’s world cup 2022) मधील सहाव्या सामन्यात भारतीय संघाने दणदणीत विजय नोंदवला. एकतर्फी झालेल्या सामन्यात भारताने बांगलादेशचा 110 धावांनी पराभव केला. (IND W vs BAN W)

प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 229 धावा केल्या आणि त्यानंतर बांगलादेश संघाला केवळ 119 धावांत गुंडाळले. भारताने (IND W vs BAN W) सहाव्या सामन्यात तिसरा विजय नोंदवला आहे आणि आता संघाने गुणतालिकेत वेस्ट इंडिजला मागे टाकले आहे आणि तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.

भारताच्या (women’s world cup 2022)या विजयानंतर जाणून घ्या, भारत उपांत्य फेरीपर्यंत पोहोचण्याची कितपत अपेक्षा आहे, भारत हा गेल्या विश्वचषकात अंतिम सामना खेळलेला संघ आहे.

पॉइंट टेबल : (पॉइंट टेबल) (women’s world cup 2022)

1. ऑस्ट्रेलिया (P6 W6 L0; अंक 12; NRR +1.28)
2. दक्षिण आफ्रिका (P5 W4 L1; अंक 8; NRR +0.09)
3. भारत (P6 W3 L3; अंक 6; NRR +0.76)
4. वेस्ट इंडिज (P6 W3 L3; अंक 6; NRR -0.88)
5. इंग्लंड (P5 W2 L3; अंक 4; NRR +0.32)
6. न्यूझीलंड (P6 W2 L4; अंक 4; NRR -0.22)
7. बांगलादेश (P5 W1 L4; अंक 2; NRR -0.75)
8. पाकिस्तान (P5 W1 L4; अंक 2; NRR -0.87)

यावेळी विश्वचषकात (women’s world cup 2022) राऊंड रॉबिन फॉर्मेटमध्ये सामने खेळवले जात आहेत, म्हणजेच लीग मॅच संपल्यानंतर अव्वल चार संघ सेमीफायनल खेळणार आहेत.

भारत आणि बांगलादेश यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यास्तिका भाटियाला शानदार अर्धशतक झळकावल्याबद्दल सामनावीराचा पुरस्कारही देण्यात आला. गोलंदाजीतील उत्कृष्ट कामगिरीमुळे भारताने पुन्हा एकदा आणखी एक विजय मिळवला आहे. भारतासाठी स्नेह राणाने चार बळी घेत पुनरागमन केले कारण बांगलादेशचे फलंदाज भारताच्या गोलंदाजी आक्रमणाच्या दबावाखाली दिसले. याआधी मंगळवारी ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेचा पाच गडी राखून पराभव करत स्पर्धेतील विजयी घोडदौड कायम राखली

भारतासाठी अजूनही खडतर आव्हान

या विश्वचषकामधील साखळी सामन्यालातील अंतिम सामना भारत २७ मार्च रोजी साऊथ आफ्रिके विरुद्ध खेळणार आहे. या स्पर्धेत ऑस्ट्रेलियानंतर साऊथ आफ्रिका हा मजबूत संघ राहिला आहे. त्याला फक्त ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्वीकारावा लागला आहे. गुणतालिकेत तो ऑस्ट्रेलिया नंतर दुसऱ्या स्थानावर आहे. भारताला सेमी फायनलमध्ये पोहचण्यासाठी साऊथ आफ्रिकेला पराभूत करणे गरजेचे आहे.

वेस्ट इंडिज आणि इंग्लंडच्या सामन्यांकडे भारताचे लक्ष

सध्या भारत विश्वचषकातील गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. त्याच्या नंतर अनुक्रमे वेस्ट इंडिज आणि इंग्लंडचा समावेश होतो. भारत आणि वेस्ट इंडिजचे समान ६ गुण आहेत. फक्त रनरेटमुळे भारत वरील स्थानावर आहे. २४ मार्च रोजी वेस्ट इंडिजचा सामना साऊथ आफ्रिकेशी होणार आहे. जर साऊथ आफ्रिकेला वेस्ट इंडिजने पराभूत केले व साऊथ आफ्रिकेने भारताला २७ मार्चच्या सामन्यात पराभूत केले तर मात्र भारतासाठी स्थिती अवघड होऊ शकते.

तसेच इंग्लंड चार गुणांसह पाचव्या स्थानावर असला तरी साखळी सामन्यात त्याच्याकडे दोन सामने शिल्लक आहेत. इंग्लंड २४ मार्च रोजी पाकिस्तान सोबत व २७ मार्च रोजी बांगलादेश बरोबर भिडणार आहे. पाकिस्तान आणि बांगलादेशची कामगिरी या स्पर्धेत सुमार दर्जाची राहिली आहे. त्यामुळे इंग्लंड या दोन्ही संघाना सहज पराभूत करेल शिवाय इंग्लंडचा रनरेट देखिल भारतापेक्षा चांगला आहे. त्यामुळे भारताची सेमी फायनलची वाटचाल अद्याप ही जर तर वर अवलंबून आहे.

Back to top button