AUS vs SA : ऑस्ट्रेलियाचा सलग सहावा विजय, द. आफ्रिकेचा पहिला पराभव | पुढारी

AUS vs SA : ऑस्ट्रेलियाचा सलग सहावा विजय, द. आफ्रिकेचा पहिला पराभव

पुढारी ऑनलाईन डेस्क : आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या २१व्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेचा ५ गडी राखून पराभव केला (AUS vs SA). प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने ५० षटकांत ५ गडी गमावून २७१ धावा केल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने ४५.२ षटकात ५ गडी गमावून २७२ धावा करत विजय मिळवला. ऑस्ट्रेलियन कर्णधार मेग लॅनिंगला तिच्या जबरदस्त फलंदाजीसाठी सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.

Image

नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेची सुरुवात चांगली झाली. लिझेल ली आणि लॉरा वोल्वार्ट या सलामीच्या जोडीने ८८ धावांची भर घातली. ही भागीदारी एलाना किंगने लिझेलला (३६) बाद करून मोडली. त्यानंतर लारा गुडॉल १५ धावा करून बाद झाली. दरम्यान, वोल्वार्टने आपले अर्धशतक पूर्ण केले आणि कर्णधार सून लुससह तिसऱ्या विकेटसाठी ९१ धावांची भागिदारी केली. वोल्वार्टचे शतक दहा धावांनी हुकले. ती ९० धावा काडून पॅव्हेलियनमध्ये परतली. लूसनेही ५२ धावांचे योगदान दिले. खालच्या क्रमवारीत, मारियान कॅप (नाबाद ३०) आणि क्लो ट्रायॉन (नाबाद १७) यांनी झटपट २५ चेंडूत ४३ धावांची भागिदारी केली आणि संघाला चांगल्या धावसंख्येपर्यंत पोहचवले. अशा प्रकारे द. आफ्रिकेने निर्धारित ५० षटकात ५ गडी गमावून २७१ धावसंख्या उभारली. ऑस्ट्रेलियाच्या पाच गोलंदाजांना प्रत्येकी एक विकेट घेण्यात यश आले. (AUS vs SA)

Image

२७२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाली. ५० धावांच्या आतच त्यांना दोन धक्के बसले. पहिला सलामीवीर फलंदाज अॅलिसा हिली (५) संघाची धावसंख्या १४ असताना आणि त्यानंतर ४५ धावसंख्येवर रेचेल हेन्स (१७) पॅव्हेलियनमध्ये परतल्या. त्यानंतर कर्णधार मेग लॅनिंगने संयमी फलंदाजी केली. तिने पहिल्यांदा बेथ मुनी (२१) सोबत तिसऱ्या विकेटसाठी ६०, त्यानंतर चौथ्या विकेटसाठी ताहलिया मॅकग्रा (३२) सोबत ९३, आणि पावव्या विकेटसाठी ऍशलेह गार्डनर (२२) सोबत ४३ धावांची महत्त्वपूर्ण भागिदारी केली. अखेरीस तिने सहाव्या विकेटसाठी अॅनाबेल सदरलँडसह २२ धावा जोडून विजयी लक्ष्य पार केले. (AUS vs SA)

Image

एकाबाजूने विकेट पडत असल्या तरी ऑस्ट्रेलियन कर्णधार लॅनिंगने चिवट फलंदाजीचे प्रदर्शन केले. तिने नाबाद शतकी (१३५*) खेळी साकारत संघाला विजय मिळवून दिला. अशाप्रकारे ऑस्ट्रेलियाने ४५.२ षटकात ५ बाद २७२ करून सलग सहाव्या विजयाची नोंद केली. सध्याच्या विश्वचषकात ऑस्ट्रेलियाचा हा सहावा विजय आहे, तर दक्षिण आफ्रिकेला पहिल्या पराभवाला सामोरे जावे लागले. (AUS vs SA)

Back to top button