Delhi High Court : दिल्ली दंगलीवरून गांधी कुटुंबीय आणि भाजपच्या नेत्यांना नोटिसा | पुढारी

Delhi High Court : दिल्ली दंगलीवरून गांधी कुटुंबीय आणि भाजपच्या नेत्यांना नोटिसा

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : देशाच्या राजधानीत दोन वर्षांपूर्वी झालेल्या दंगलीप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने मंगळवारी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, माजी अध्यक्ष राहुल गांधी, प्रियांका गांधी-वधेरा यांच्यासह भाजप नेते व केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर, खा. प्रवेश वर्मा, कपिल मिश्रा आदींना नोटिसा बजावल्या. दंगल भडकण्यासाठी वरील नेत्यांची प्रक्षोभक भाषणे कारणीभूत असल्याचा दावा न्यायालयात करण्यात आला आहे. (Delhi High Court)

दंगलीस कारणीभूत असलेल्या वरील नेत्या, सामाजिक कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करावेत, असे काही याचिकांमध्ये म्हटले आहे.

याचिकांची दखल घेत न्यायमूर्ती सिद्धार्थ मृदुल आणि न्यायमूर्ती रजनीश भटनागर यांच्या खंडपीठाने संबंधितांना नोटिसा बजावल्या.

ज्या नेत्यांवर गंभीर आरोप झालेले आहेत, त्या नेत्यांच्या पक्षांकडून उत्तर मागविले जावे, असेही याचिकात म्हटलेले आहे. (Delhi High Court)

Back to top button